तक्रारनिवारण आता एका क्लिकवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:14 IST2021-02-17T04:14:09+5:302021-02-17T04:14:09+5:30
यामध्ये नागरिकांना महापालिकेशी संबंधित विविध सुविधा सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, तसेच भारत सरकार, महाराष्ट्र शासनांच्या विविध योजनांचे अर्ज व दाखले ...

तक्रारनिवारण आता एका क्लिकवर
यामध्ये नागरिकांना महापालिकेशी संबंधित विविध सुविधा सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, तसेच भारत सरकार, महाराष्ट्र शासनांच्या विविध योजनांचे अर्ज व दाखले त्याचबरोबर कोविड १९ बेडची उपलब्धता व औषध याबाबत माहितीसुद्धा या तक्रार निवारण अॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. एका क्षणात विविध सेवा व सुविधांची माहिती नागरिकांना मोबाइलच्या एका टचवर उपलब्ध होणार असल्याचे सुशांत ढमढेरे यांनी सांगितले.
ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली वापरण्यासाठी नागरिकांना अॅप डाऊनलोड करून घ्यावे लागेल. मोबाईलमध्ये मराठी कीपॅड असेल तर मराठी भाषेतही नागरिक तक्रार दाखल करू शकतात. तसेच तक्रार दाखल केल्यानंतर नागरिक तक्रारीविषयीची सद्यस्थिती जाणून घेऊ शकतात.
फोटो ओळ - राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सुशांत ढमढेरे यांनी विकसित केलेल्या तक्रार निवारण अँपची माहिती घेताना सुनेत्रा पवार.