वेल्हे पोलीस स्टेशन येथे आज तक्रार निवारण दिनाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:15 IST2021-09-09T04:15:27+5:302021-09-09T04:15:27+5:30

यावेळी तक्रारींचे निवारण करताना तक्रारदारांनीही समक्ष उपस्थित पोलीस ठाण्यात उपस्थित राहावे असे आवाहन वेल्हे पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक मनोज ...

Grievance Redressal Day organized today at Velhe Police Station | वेल्हे पोलीस स्टेशन येथे आज तक्रार निवारण दिनाचे आयोजन

वेल्हे पोलीस स्टेशन येथे आज तक्रार निवारण दिनाचे आयोजन

यावेळी तक्रारींचे निवारण करताना तक्रारदारांनीही समक्ष उपस्थित पोलीस ठाण्यात उपस्थित राहावे असे आवाहन वेल्हे पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक मनोज पवार यांनी केले आहे. तक्रारदारांच्या तक्रारीचे निवारण करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन यांना आदेश देण्यात आले आहेत. यानुसार वेल्हे पोलीस स्टेशन येथेही तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले असून, पोलीस स्टेशनला प्राप्त झालेल्या तक्रारीसंबंधित अर्जदार, गैरअर्जदार यांना समक्ष बोलावून त्यांच्या तक्रार अर्जातील तक्रारींवर त्वरित निर्णय घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

संबंधित तक्रारदारांनी गुरुवारी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे. सदर तक्रार निवारण दिनाला हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील या भेट देणार आहेत, तसेच वेल्हे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, बीट अमलदार व कर्मचारी यावेळी उपस्थित राहणार असून, तक्रारदारांच्या तक्रारींचे जागच्या जागी निराकरण केले जाणार आहे.

जास्तीत जास्त तक्रारदारांनी गुरुवारी उपस्थित राहून आपल्या तक्रारींचा ताबडतोब निपटारा करून घ्यावा, असे आवाहन वेल्हे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी केले आहे.

Web Title: Grievance Redressal Day organized today at Velhe Police Station