शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन परिस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी तक्रार निवारण कक्ष सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 12:06 IST

लॉक डाऊन केल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना शारीरिक ,मानसिक, आर्थिक यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे लागत आहे.

ठळक मुद्देतक्रारीचे तात्काळ निवारण व अंमलबजावणी सदर नियंत्रण कक्षामार्फत करण्यात येईल

पुणे : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यामध्ये लॉकडाऊन परिस्थितीत लागु करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना काही अडचण आल्यास यासाठी जिल्ह्यात खास तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आले आहेत.जिल्हयातील इतर सर्व तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष सुरु असून , त्याचा नंबर 020- 26123371 /1077 टोल फ्री नंबर आहे. (नियंत्रण कक्ष 24  7 कार्यरत आहे. ) त्यावर कोरोनाच्या अनुषंगाने सर्व तक्रारी स्वीकारल्या जातात. त्यासाठी उपजिल्हाधिकारी सुनिल गाडे यांची स्वतंत्र समन्वयक अधिकारी नेमणुक करण्यात आली आहे.लॉकडाऊन परिस्थितीमुळे उदयोग व्यवसाय प्रभावित झाल्यामुळे कामगार विस्थापित / बेरोजगार व परराज्यातील अडकलेले कामगार या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी कामगारांच्या तक्रारींबाबत स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर कक्षाचे फोन नंबर 020- 26111061 व मोबाईल नंबर 7517768603 असा असून या नंबरवरती कामगारांच्या तक्रारी स्वीकारणार आहेत. सदर तक्रारींबाबत उपजिल्हाधिकारी सुभाष बागडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर जेष्ठ नागरीक व दिव्यांगासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष (020- 29706611) स्थापन करण्यात आला असून या नियंत्रण कक्षात सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत संपर्क करुन आपली तक्रार देऊ शकतात. त्यासाठी सहा.आयुक्त विजय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कोरोना विषाणुच्या अनुषंगाने जिल्हयातील नागरीकांना तसेच कामगार, मजुर व इतर कुठल्याही तक्रारीसाठी सदर नियंत्रण कक्षाकडे तक्रार देण्यात यावी व सदर तक्रारीचे तात्काळ निवारण व अंमलबजावणी सदर नियंत्रण कक्षामार्फत करण्यात येईल असे स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर राम