शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात भव्य रॅलीव्दारे फुले दांपत्याला अभिवादन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 14:06 IST

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.

ठळक मुद्देमहाराष्ट्रातील हजारो फुले विचार समर्थकांचा सहभाग ; माळी महासंघातर्फे आयोजन 

पुणे: सजवलेले रथ, लेझीम, टाळ-मृदुंग आणि महिला ढोल पथक यासह फुले विचारांचे फलक असलेले नागरिक आणि फुले दाम्पत्यांचा जयजयकार अशा उत्साहाच्या वातावरणात माळी महासंघातर्फे आयोजित भव्य रॅलीव्दारे फुले दांपत्याला अभिवादन करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. मुलींच्या शिक्षणासाठीची ही ज्ञानज्योत आज देशाला प्रगती पथावर नेत आहे. दरवर्षी प्रमाणे १ जानेवारी हा दिवस यंदा देखील फुले दांपत्य सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात आला.या रॅलीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून माळी समाजातील बंधू-भगिनी, समविचारी व्यक्ती, कार्यकर्ते आणि फुले विचार प्रचारक - प्रसारक सहभागी झाले होते. यावेळी माळी महासंघाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे, अखिल भारतीय माळी महसंघाचे अध्यक्ष गोविंद डाके,  महात्मा फुले वसतिगृहाचे अध्यक्ष दीपक जगताप, समाज प्रमुख जगन्नाथ लडकत, समाज प्रमुख राजाभाऊ रायकर, काळुराम उर्फ अण्णा गायकवाड, शहर संयोजक अश्विन गिरमे, पश्चिम महाराष्ट्राचे संयोजक अतुल क्षीरसागर, जिल्हा संयोजक चंद्रशेखर दरवडे,  प्रवीण बनसोडे, अनिल साळुंखे, महात्मा फुले मंडळाचे पिंपरी-चिंचवड प्रमुख हनुमंत माळी, रेखाताई रासकर, राखी रासकर, शारदा लडकत, संतोषअण्णा लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. सजवलेले रथ, लेझीम, टाळ-मृदुंग आणि महिला ढोल पथक यासह फुले विचारांचे फलक असलेले नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. भिडे वाडा येथून या भव्य रॅलीचा प्रारंभ होऊन ती पुढे दगडूशेठ गणपती मंदिर, शिवाजी रस्ता, मंडई चौक, फडगेट पोलीस चौक, पानघटी चौक, गंजपेठ पोलीस चौकी चौक मार्गे महाराणा प्रताप रस्त्याकडून येऊन फुले वाडा येथे या रॅलीचा समारोप झाला. यावेळी यावेळी माळी महसंघाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ..............

टॅग्स :PuneपुणेSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेEducationशिक्षण