लोकमान्य टिळकांना पुण्यतिथीदिनी अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:36 IST2017-08-02T03:36:39+5:302017-08-02T03:36:43+5:30

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंडई तसेच केसरीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर मुक्ता टिळक व उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Greetings to Lokmanya Tilak | लोकमान्य टिळकांना पुण्यतिथीदिनी अभिवादन

लोकमान्य टिळकांना पुण्यतिथीदिनी अभिवादन

पुणे : लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंडई तसेच केसरीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर मुक्ता टिळक व उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
काँग्रेस भवन येथेही जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकमान्यांना अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष रमेश बागवे, सरचिटणीस रमेश अय्यर, यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
माजी आमदार मोहन जोशी, गोपाळ तिवारी, मुकारी अलगुडे, म. वि. अकोलकर, राजू डांगी, भगवान धुमाळ, अनसूया गायकवाड, राजेश शिंदे, राधिका मखामले, लतेंद्र भिंगारे आदी या वेळी उपस्थित होते. नगरसेवक अजित दरेकर यांनी सूत्रसंचालन केले. उत्तमराव भूमकर यांनी आभार मानले.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त हिराबाग येथील पक्ष कार्यालयात पक्षाचे उपाध्यक्ष अशोक राठी यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या वेळी शिवाजी गायकवाड, संजय दमोदरे, मोहन कांबळे, मीनाक्षी शिंदे यांची भाषणे झाली. शंकर शिंदे, मोहन सोनवणे, संजय गायकवाड, विक्रम मोरे, मनोज पाचपुदे, शिवाजी कंधारे, शैलेंद्र गायकवाड, महेश म्हस्के, रूपेश आखाडे, गोपी सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Lokmanya Tilak