शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

हिरव्यागार डोंगररांगा, बरसणाऱ्या सरी अन्‌ शीतल गारवा, बाराही महिने श्रावणच हवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:00 IST

‘श्रावण’ नुसतं नाव उच्चारलं तरी मनात आनंदाची एक झुळूक उमटते. हिरव्यागार डोंगररांगा, नभातून बरसणाऱ्या सरी, शीतल गारवा अशी सुखद अनुभूती देणारा श्रावण महिना शुक्रवारपासून सुरू होत आहे.

कृष्णकुमार गोयलअध्यक्ष, कोहिनूर ग्रुप आणि उपाध्यक्ष, पुणे फेस्टिव्हलहिंदू आणि जैन धर्मात श्रावणाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. फुललेला निसर्ग, सर्वत्र बहरलेली हिरवाई, पवित्र सणांची रेलचेल, शाकाहाराचा उद्घोष, चातुर्मास अशा अनेक बाबींमुळे श्रावण महिना पवित्र मानला जातो. हसरा, फुललेला, सुगंधाने गंधीत झालेला आणि तनामनात एक चैतन्याची लाट फुलविणारा हा ‘श्रावण’ प्रत्येकाच्या मनाला व्यापून टाकतो. त्याची चाहूल लागते ती आकाशात उमटणाऱ्या इंद्रधनुष्याच्या कमानीने, तर कधी ढगाआडून हसलेल्या उन्हामुळे! .

श्रावणातील पावसाची सर ही जणू मनात एक आनंदगीतच गात येत असते. श्रावणाची असंख्य मराठी भावगीते रसिकांच्या मनावर रुंजी घालतात, तशीच अन्य भारतीय भाषांमध्येही ‘सावन’च्या गीतांचा खजिना अनुभवास मिळतो. मराठी मनाला लता मंगेशकरांनी गायलेलं ‘श्रावणात घन निळा बरसला...’ आजही चिरतरुण वाटतं, तर हिंदी सिनेमांमध्ये ‘सावन’वर आधारित असंख्य गीतं आजही मनात घर करून आहेत.

श्रावणात येणारे नागपंचमी, नारळी पौर्णिमा, दहीहंडी, पोळा, मंगळागौर - हे केवळ उत्सव नाहीत, तर संस्कृतीची आठवण करून देणारे सोहळे आहेत. प्रत्येक सणात नात्यांची गोडी, परंपरेची जोड आणि आनंदाची उधळण असते. श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करणे महाराष्ट्रात प्रचलित आहे. श्रावणी सोमवारी श्री शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणे हा तर प्रत्येकाच्या श्रद्धेचाच भाग. या दिवशी कोट्यवधी भाविक उपवास करतात. उत्तर भारतात लाखो लोक पायी कावड घेऊन जात धर्म श्रद्धेची आराधना करतात. असा हा प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा श्रावण महिना जुलैच्या उत्तरार्धात पौर्णिमेपासून सुरू होतो आणि ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात पुढील पौर्णिमेच्या दिवशी संपतो. तामिळनाडूत ‘अवनी’, बंगालमध्ये ‘श्राबोन’ अशा विविध नावांनी श्रावण महिन्याचा उल्लेख होतो. श्रावण हा वर्षा ऋतूचा दुसरा महिना असतो.

श्रावण महिन्यात पडणाऱ्या जलधारांनी नद्या भरून वाहतात, तळी-विहिरी व धरणे पाण्याने भरतात. जमिनीखाली पाणी मुरत राहते, त्यामुळे भूगर्भजल पातळी वाढते. शेतीतील खरीप पिकांना हा पाऊस म्हणजे वरदानच असतो. वृक्ष, वेली, शेती, फळझाडे, फुले या साऱ्यांनाच बहर येत असतो. निसर्गातील प्राणी व पक्ष्यांना तृप्त ठेवणारा हा श्रावण महिना असतो. या काळात अनेक भक्त मांसाहार टाळून शाकाहाराचा स्वीकार करतात. जणू सृष्टीला नवं बळ मिळतं.

चातुर्मासाचा कालखंडही हाच असतो. जैन धर्मीयांमध्ये सर्वत्र विहार करणारे साधुसंत, मुनी, आचार्य, साध्वी एका ठिकाणी साधना करतात. वातावरणात शांतता आणि अध्यात्म भरून राहतो. या चातुर्मास काळात लाखो भक्त श्रद्धेने दर्शनासाठी येतात.

श्रावण हा केवळ एक ऋतू नाही - तो निसर्ग, अध्यात्म, श्रद्धा आणि आनंद यांचा सुंदर संगम आहे. तो जीवनात चैतन्य, उमेद आणि समाधान फुलवतो. म्हणूनच वाटतं - दर महिना श्रावण असावा, दरक्षणी मनात श्रावण रुंजी घालावा !

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र