शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

सवाईचे महात्म्य टिकविण्याचे नवोदितांसमोर मोठे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 3:42 AM

आजपासून प्रारंभ : संगीतप्रेमींच्या कसोटीवर उतरणार का?

पुणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या ६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवात भारतीय अभिजात संगीतविश्वात मानाचे स्थान मिळविलेल्या दिग्गज कलावंतांपेक्षा नवोदित कलाकारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नव्या जागेत सवाईचे सूर प्रस्थापित करण्याचे मोठे शिवधनुष्य या नवोदितांना पेलावे लागणार आहे. या कसोटीवर ते पूर्णपणे उतरणार का? याकडे संगीतप्रेमींचे लक्ष लागले आहे.अनेक वर्षांपासून पेठेच्या संस्कृतीमध्ये रूळलेला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदाच्या वर्षीपासून मुकुंदनगरमधील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुलच्या जागेत स्थलांतरित झाला आहे. देशविदेशातील रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला उद्या (बुधवार) पासून दिमाखात सुरुवात होत आहे. या पेठेबाहेरच्या पुण्यात पुन्हा नव्याने महोत्सव स्थिरस्थावर करणे हेच आता आयोजकांपुढचे मोठे आव्हान आहे. महोत्सवाच्या स्थापनेपासूनच भारतीय अभिजात संगीत विश्वातील दिग्गज कलावंतांना या स्वरमंचावर ऐकण्याची रसिकांना सवय झाली आहे. दर वर्षी एक वर्षाआड महोत्सवामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया, मेवाती घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. जसराज, पं. शिवकुमार शर्मा, ज्येष्ठ व्हायोलिनवादक एन. राजम यांसारख्या महाराष्ट्राबाहेरील विविध कलावंतांची महोत्सवात हमखास वर्णी लावली जाते. पण यंदा यातील एकही कलाकार महोत्सवात दिसणार नाही.आयोजकांनी पं. बिरजू महाराज, उस्ताद शाहीद परवेज, पं. उल्हास कशाळकर, बेगम परवीन सुलताना अशा काही मान्यवर कलावंताना सोडले तर यंदा १३ नवोदित कलाकारांना महोत्सवात संधी दिली आहे. गतवर्षी महोत्सवात ९ नवोदित कलाकार होते. यंदा ही संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे नव्या जागेत महोत्सव स्थिरस्थावर करण्याची भिस्त याच नवोदितांवर आहे. सवाईमध्ये आपली कला सादर करण्याचे प्रत्येक नवोदित कलाकाराचे स्वप्न असते. यंदाच्या वर्षी नवोदितांसाठी ही कसोटी ठरणार आहे. मात्र ज्येष्ठ रसिकमंडळींनी महोत्सवात नवोदितांपेक्षाही दिग्गज कलावंतांच्या सादरीकरणाला काहीसे झुकते माप दिले आहे.महोत्सवातील आजचे कार्यक्रम(दुपारी ३ ते रात्री १०)कल्याण अपार, औरंगाबाद (सनई)रवींद्र परचुरे (गायन)वसंत काब्रा (सतार)प्रसाद खापर्डे (गायन)परवीन सुलताना (गायन)यंदाच्या महोत्सवातील कलाकार पाहिले तर नवोदित कलाकार अधिक आहेत. जी चांगली गोष्ट आहे. नवोदितांनादेखील व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला हवे. कारण, शेवटी तेच हा सांगीतिक वारसा पुढे नेणार आहेत. मात्र आमच्यासारख्या कलावंतांना अजूनही ‘जुनं तेच सोनं’ वाटत असल्याने ज्येष्ठ कलावंतांचे अविष्कार अनुभवणे ही आमच्यासाठी सुखद पर्वणी असते.- वासुदेव कुलकर्णीइतर महोत्सवाची तिकिटे ही आमच्यासारख्या लोकांना फारशी परवडणारी नसतात त्यामुळे सवाईमध्ये जुन्या-नव्या कलाकारांना ऐकण्याची पर्वणी मिळते. मी ठाण्यावरून दर वर्षी या महोत्सवाला हजेरी लावतो. ज्येष्ठ कलावंतांना ऐकायला मिळावे, केवळ एवढीच त्यामागची इच्छा असते.- नाना चरणकरआठवण आजही मनातभविष्यात हा महोत्सव नवोदित कलाकारांमुळे ओळखला जाण्याची शक्यता आहे. ज्यात गैर काहीच नाही. पण याच आम्ही महोत्सवात पं. फिरोज दस्तूर, सरस्वतीबाई राणे, किशोरी आमोणकर, पं. भीमसेन जोशी यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर गायकांच्या मैफली अनुभवल्या आहेत, त्याची आठवण आजही मनात आहे.या कलावंतांना समोर बसून ऐकणे हा अनुभव काहीसा वेगळाच आहे. त्यामुळे महोत्सवात नवोदितांबरोबर दिग्गज कलावंतांचे अविष्कारही अधिकाधिक अनुभवायला मिळावेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ रसिकमंडळींनी व्यक्त केली आहे.