शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष, डाळिंब, गव्हाचे नुकसान

By admin | Updated: March 2, 2015 01:17 IST

शनिवारपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे व ढगाळ हवामानामुळे पुणे जिल्हातील द्राक्ष, डाळिंब, गहू, हरभरा आदी पिकांचे नुकसान झाले.

भोर / खोडद : शनिवारपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे व ढगाळ हवामानामुळे पुणे जिल्हातील द्राक्ष, डाळिंब, गहू, हरभरा आदी पिकांचे नुकसान झाले. काढणीला आलेल्या गव्हाचे प्लॉट भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांवर डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे. हरभरा, ज्वारी, आंबा, भाजीपाला व द्राक्ष या पिकांच्या एकूण २४१५०० हेक्टर क्षेत्रापैकी सरासरी १० टक्के पिकांचे नुकसान झाले असून, पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊन पिकांची प्रतवारी खराब होणार आहे. शनिवारी जिल्ह्यात एकूण २७.३१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ज्वारीच्या एकूण १३२००० हेक्टर क्षेत्रापैकी ७० टक्के पिकाची काढणी झाली होती तर, राहिलेल्या ३० टक्के पीक काढणी करून शेतात भिजत असल्याने ज्वारीची प्रतवारी खराब होणार आहे. ज्वारीचे १० टक्के नुकसान झाले आहे. गहू २५००० हेक्टरवर असून १० टक्के क्षेत्र काढणीच्या अवस्थेत आहे. पावसाने पिके जमिनीवर लोळल्याने काढणी करता येत नाही. त्याचेही १० टक्के नुकसान होणार आहे. हरभरा एकूण २४००० हेक्टरवर असून गव्हाप्रमाणेच परिपक्व होऊन दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. काढणी करताना सुमारे १० टक्के नुकसान होणार आहे. द्राक्षाचे पीक बारामती, जुन्नर व इंदापूर तालुक्यात २५०० हेक्टरवर घेतले जाते़ ४०.५० हेक्टर क्षेत्रावरील तोडणी पूर्ण झाली असून, उर्वरित बागेत पावसाने बुरशीचा प्रादुर्भाव होऊन फळाची गुणवत्ता कमी होणार आहे.पाऊस थांबल्यावर उपाय योजना करता येईल. द्राक्षाचे २०.२६ टक्के नुकसान झाले आहे भाजीपाला ५१००० हेक्टरवर घेतला जातो. बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाला. १०.२० टक्के नुकसान आहे. तर आंबा ७००० हेक्टरवर घेतला जातो. पावसाने मोहर गळून गेला असून, पाऊस थांबल्यावरच फवारणी करता येणार आहे. १० टक्के नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यात रविवारी सकाळपर्यंत झालेला पाऊस (मि़मी़) बारामती ४ , पुरंदर २२, इंदापूर १, मुळशी ४०, आंबेगाव ३८, वेल्हे २८, जुन्नर ४२, भोर ३७, खेड ४३, दौड ९, शिरूर २०, मावळ २७ पाऊस झाला असून, एकूण २७.३१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे़ पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा, आंबा व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून, आंबा व भाजीपाला पिकांवर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे़ पावसाच्या पाण्यात भिजल्याने पिकांची प्रतवारी खराब होणार असू,न पाऊस उघडल्यावरच त्यावर उपाययोजना करता येईल, असे भोर तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी सांगितले . (वार्ताहर)