मार्केट यार्डात द्राक्षांचा हंगाम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:01 IST2021-02-05T05:01:04+5:302021-02-05T05:01:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणाऱ्या द्राक्षांचा हंगाम सुरू झाला. गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील फळ विभागात ...

मार्केट यार्डात द्राक्षांचा हंगाम सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणाऱ्या द्राक्षांचा हंगाम सुरू झाला. गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील फळ विभागात दररोज सुमारे १५ ते २० टन द्राक्षांची नियमित आवक सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत ही आवक आणखी वाढेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
यंदा हंगाम वेळेवर सुरू झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हंगामाच्या सुरुवातीस १० ते २० टक्के अधिक दर मिळत आहे. आकाराने मोठ्या आणि चवीने गोड असलेल्या जम्बो द्राक्षांना जास्त मागणी आहे. अलीकडच्या काळात याच द्राक्षांची लागवड जास्त होत आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठे महंकाळ तालुक्यातून पांढऱ्या द्राक्षाची, तर जिल्हातील नारायणगाव, बारामती भागातून आणि सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून जम्बो अर्थात काळ्या द्राक्षांची आवक होत आहे.
......
द्राक्षांचा प्रकार घाऊक बाजारात दर्जानुसार मिळणारा भाव
जम्बो (१० किलो) ६०० ते ९००
कृष्णा शरद (१० किलो) ६०० ते १०००
सोनाका सुपर (१५ किलो) ७०० ते ११००
माणिक चमण (१५ किलो) ६०० ते ७००
थॉमसन (१५ किलो) ५०० ते ७००
---
मागील वर्षी करोनाच्या परिस्थितीचा फटका द्राक्षाला बसला होता. त्यामुळे या वर्षी द्राक्षांकडून चांगले उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. हवामानही पिकास अनुकूल आहे. महाबळेश्वर, पाचगणी, वाई, लोणावळा, कोकण आदी पर्यटन भागांतून आणि गोवा, गुजरात, बेंगळुरू, कोलकाता आणि दिल्ली येथून द्राक्षांना चांगली मागणी आहे.
- अरविंद मोरे, व्यापारी, मार्केट यार्ड