फसवणूक प्रकरणातील दोघांना जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:08 IST2021-07-11T04:08:40+5:302021-07-11T04:08:40+5:30
भोर शहरातील सन्मित्र नागरी सहकारी पतसंस्थेत सोनेतारण करून सुमारे २ कोटी ५ लाख १७ हजार रुपये कर्ज परतफेड न ...

फसवणूक प्रकरणातील दोघांना जामीन मंजूर
भोर शहरातील सन्मित्र नागरी सहकारी पतसंस्थेत सोनेतारण करून सुमारे २ कोटी ५ लाख १७ हजार रुपये कर्ज परतफेड न केल्यामुळे भोर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पतसंस्थेचे चेअरमन जयाजी शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.
सतीश किसन शेटे, संदीप वसंत बोडके (रा. वाघजाईनगर, ता. भोर), दत्तात्रय नारायण दरेकर (रा. नागोबाआळी, भोर), डॉ. जीवन पाठक (रा. आमराईआळी, भोर) यांच्या विरोधात भोर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, सतीश शेटे व संदीप बोडके यांनी पुणे येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.या प्रकरणी ॲड. सचिन जाधव व ॲड. प्रकाश लाड यांनी काम पाहिले.