शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची रक्कम शासनाकडे पडून; लाभार्थी मात्र प्रतीक्षेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 12:51 IST

विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई व सुरक्षा कवच देण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू करण्यात आली.

पुणे: अपघात ग्रस्त विद्यार्थी व पालकांना आर्थिक सहकार्य करण्याच्या उद्देशाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या राजीव गांधीविद्यार्थीअपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते.मात्र, शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागांना निधीचे वाटप करूनही तब्बल १ कोटी ११ लाख ५ हजार रुपये निधी खर्चच झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई व सुरक्षा कवच देण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू करण्यात आली. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देला जातो. त्यात विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याचा पालकांना ७५ हजार रुपये अनुदान दिले जाते. तसेच  अपघातामध्ये कायमचे अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये तर एक अवयव व डोळा निकामी झालेल्या अपंगत्व आल्यास ३० हजार रुपये अनुदान दिले जाते.

राजीव गांधी सानुग्रह अनुदान योजनेच्या लाभाचा प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांचे पालक व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक , गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहेत.त्यानुसार २०१९-२० या शैक्षणिक वर्षात एकूण ६३५ विद्यार्थ्यांना अनुदानाची रक्कम मिळणे अपेक्षित होते. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे ४ कोटी ६७ लाख २९ हजार रुपये अनुदानाची रक्कम वितरित केली आली. मात्र, त्यातील केवळ ३ कोटी ५६ लाख १६ हजार रुपये रक्कमच ४८३ अपघातग्रस्त विद्यार्थी व त्यांच्या पालकांपर्यंत पोहचली.त्यामुळे १ कोटी ११ हजार ५ हजार रक्कम वितरित करूनही लाभार्थ्यांना मिळाली नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेRajiv Gandhiराजीव गांधीAccidentअपघातStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकार