डिंबा कालव्यात बडवून आजोबा -नातीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:28 IST2021-01-13T04:28:50+5:302021-01-13T04:28:50+5:30

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चास येथील शेगरमळा परिसरातून डिंभे धरणाचा डावा कालवा जात आहे. तेथून सदाशिव विष्णू ...

Grandfather and grandson drowned in Dimba canal | डिंबा कालव्यात बडवून आजोबा -नातीचा मृत्यू

डिंबा कालव्यात बडवून आजोबा -नातीचा मृत्यू

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चास येथील शेगरमळा परिसरातून डिंभे धरणाचा डावा कालवा जात आहे. तेथून सदाशिव विष्णू शेगर , नात अन्विता प्रल्हाद शेगर व स्वरा प्रल्हाद शेखर (वय ७) हे तिघे जण शेतीकडे फेरफटका मारण्यासाठी गेले होते. शेती जवळच असणाऱ्या डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यावर नजर चुकून अन्विता कालव्याकडे गेली तिचा पाय घसरून कालव्यात पडली. आजोबांनी ते पाहिले व त्यांनी तात्काळ कालव्यात उडी मारून तिला वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु ते पाण्यात बुडाले. त्यांच्याबरोबर असणारी दुसरी नात स्वरा व शेतात काम करणाऱ्या महिलांनी आरडाओरडा करून मदतीसाठी आवाज दिला.

सिद्धेश संतोष शेखर यांनी तात्काळ परिसरातील तरुणांना या घटनेची माहिती दिली. दत्ता शेगर, रविभाऊ शेगर, संतोष शेगर, मनोज बारवे व राहुल काळे या तरुणांनी आजोबा व नात यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही, सदाशिव विष्णू शेगर व अन्विता प्रल्हाद शेगर यांना पाण्याबाहेर काढण्यात तरुणांना यश आले आहे त्यांना दोघांचा मृत्यू झाले असल्याचे जाहीर केले आहे.

Web Title: Grandfather and grandson drowned in Dimba canal