Pune: श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त मार्केटयार्डमध्ये धान्य, कडधान्य व ड्रायफ्रुटची भव्य रांगोळी 

By अजित घस्ते | Published: January 20, 2024 06:05 PM2024-01-20T18:05:32+5:302024-01-20T18:07:28+5:30

पुणे : अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त पूना मर्चंटस् चेंबरने  मार्केटयार्ड येथील सभागृहामध्ये धान्य, कडधान्य, डाळी आणि ड्रायफ्रुटस्ची ...

grand rangoli of grains, pulses and dry fruits in the market yard on the occasion of Prana Pratistha of Shri Ram Mandir. | Pune: श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त मार्केटयार्डमध्ये धान्य, कडधान्य व ड्रायफ्रुटची भव्य रांगोळी 

Pune: श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त मार्केटयार्डमध्ये धान्य, कडधान्य व ड्रायफ्रुटची भव्य रांगोळी 

पुणे : अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त पूना मर्चंटस् चेंबरने  मार्केटयार्ड येथील सभागृहामध्ये धान्य, कडधान्य, डाळी आणि ड्रायफ्रुटस्ची प्रभू राम यांची व राम मंदिर आकर्षक भव्य रांगोळी काढली आहे. मार्केटयार्ड गुळ भूसार हा अन्न धान्याचा बाजार असल्याने अन्न-धान्याचे प्रतीक म्हणून सदरच्या रांगोळीमध्ये धान्य, कडधान्य, डाळी, सुका मेवा यांचा वापर केला आहे.

सदरची रांगोळी सामेवार( दि. २२) ला सकाळी ११.०० ते सायं. ६.०० वाजेपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली असून दर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच दि पूना मर्चंटस् चेंबरतर्फे मार्केट यार्डमध्ये सजवलेल्या वाहनांमध्ये शोभा यात्रेचे आयोजन केले असून त्यादरम्यान प्रसादाचे वाटप केले जाणार आहे अशी माहिती दिली.
सदरची  आकर्षक रांगोळी  सोमनाथ आर्टस् व सविताआर्टस् तर्फे सोमनाथ भोंगळे, अभिषेक शिंदे व सविता चांदगुडे यांनी काढली आहे.

Web Title: grand rangoli of grains, pulses and dry fruits in the market yard on the occasion of Prana Pratistha of Shri Ram Mandir.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.