शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडीचे विधानसभेला सूत जुळले, पण ग्रामपंचायतीत बिघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 08:57 IST

पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडीत बिघाडी. 

पुणे : राज्यात महाआघाडी असलेल्या सत्ताधारी पक्षांची जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र बिघाडी झाली आहे. एवढेच नाही तर काही तालुक्यात मोठ्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप- शिवसेना एकत्र आली आहे. दरम्यान सध्या पारंपारिक विरोधक म्हणून एकमेकांच्या विरोधात उभे टाकले असले तरी निवडणुकीनंतर काही ग्रामपंचायतीत महाआघाडी होऊ शकते. 

जिल्हयातील 746 ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या असून, यातील 95 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. आता 15 जानेवारी रोजी 650 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. महाआघाडीत राज्याच्या सत्तेत असलेले मित्र पक्ष जिल्ह्यात एकमेकांचे पारंपारिक विरोधक आहेत. त्या स्थानिक पातळीवर पक्षाचे अस्तित्वात टिकण्यासाठी निवडणुका होणे गरजेचे असते, ही बाब लक्षात घेऊन पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. यामुळेच महाआघाडीला विधानसभेत जमले पण  ग्रामपंचायतीत बिघडले आहे .--------ग्रामपंचायतीत यंदाही राष्ट्रवादी एक नंबरवर राहिलीजिल्ह्यातील बहुतेक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. यंदाच्या निवडणुकीनंतरही राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरवर राहिली. जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी स्वतंत्र लढत आहे, काही ठिकाणी आघाडी एकत्र आहे. तर ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाआघाडी होऊ शकते.- प्रदीप गारटकर, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ---------ग्रामपंचायतीत पण महाआघाडी दिसेल सध्या राज्यात आम्ही तिन्ही मित्रपक्ष एक सरकार म्हणून एकत्र चांगल्या प्रकारे काम करत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सध्या काही ठिकाणी महाआघाडीतील पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. परंतु निवडणुकीनंतर अनेक ठिकाणी महाआघाडी झालेली दिसेल.- संजय जगताप,  आमदार तथा काँग्रेस जिल्हा अध्यक्ष. -----------पक्ष टिकवण्यासाठी लढती आवश्यक ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक गावकी भावकीचे राजकारण महत्त्वाचे असते. त्यामुळे थेट पक्षाच्या चिन्हावर या निवडणुका होत नसल्या तरी पक्षाचे अस्तित्वात टिकवण्यासाठी लढती आवश्यक आहे. आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेत्यांना निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुकीनंतर महाआघाडी होऊ शकते.- रमेश कोंडे, शिवसेना जिल्हा अध्यक्ष. --------

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणgram panchayatग्राम पंचायतShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस