शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसुधार सदिच्छा दूताला परीक्षेचा मुहूर्त; राष्ट्रीय सेवा योजना, २ महिन्यांचा कालावधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 12:45 IST

राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाच्या प्रसारासाठी राज्य सरकारने सदिच्छा दूताची नेमणूक केली असून, त्यासाठी चक्क परीक्षा हंगामाचा मुहूर्त काढला आहे.

ठळक मुद्देअमृता करवंदे यांनी ग्रामसुधार सदिच्छा दूत म्हणून निवड केल्याबद्दल सरकारचे मानले आभार शासनाने माझा नाही तर या देशातील सर्व अनाथांचा आणि वंचिताचा गौरव केला : करवंदे

पुणे : राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाच्या प्रसारासाठी राज्य सरकारने सदिच्छा दूताची नेमणूक केली असून, त्यासाठी चक्क परीक्षा हंगामाचा मुहूर्त काढला आहे. विशेष म्हणजे, त्यांचा कालावधी २०१७-१८ या शैक्षणिक कालावधीपुरता आहे. हा कालावधी संपण्यास दोन ते तीन महिनेच उरले आहेत; त्यामुळे ही नियुक्ती कागदोपत्रीच ठरण्याची दाट शक्यता आहे. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या ग्रामसुधार सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी २६ सप्टेंबर २०१७ला शाासन निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार नवेली देशमुख आणि महाराष्ट्र लोकसेवा अयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अमृता करवंदे यांची निवड करण्यात येणार होती. त्यानुसार त्यांची ग्रामसुधार सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केल्याचा शासन निर्णय मंगळवारी (दि. ६) प्रसिद्ध करण्यात आला. विनामानधन तत्त्वावर ही नियुक्ती असेल. याअंतर्गत विद्यार्थी व युवकांशी संवाद साधणे, राष्ट्रीय सेवा योजनेने घेतलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहकार्य करणे अशी कामे या दूतांना करावी लागतील. तसा कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी संबंधित कार्यक्रम समन्वयक, तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक यांची असेल. त्यांच्या प्रवास आणि निवासाची व्यवस्था संबंधित विद्यापीठ करेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या दूतांचा कालावधी हा २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी असेल. मार्च महिन्यात शैक्षणिक वर्ष संपुष्टात येईल, तसेच सध्या परीक्षांचा हंगामदेखील सुरू असल्याने या दूतांना कोणतेच काम करता येणार नाही.  

अनाथांचा गौरवसदिच्छादूत अमृता करवंदे यांनी ग्रामसुधार सदिच्छा दूत म्हणून निवड केल्याबद्दल सरकारचे आभार मानले आहेत. ‘शासनाने माझा नाही तर या देशातील सर्व अनाथांचा आणि वंचिताचा गौरव केला आहे. मी अनाथांचे प्रश्न घेऊन सरकारदरबारी जाणारी एक सामान्य मुलगी आहे. आमच्या मागणीची दखल घेणे आणि माझी सदिच्छा दूत म्हणून निवड करणे हा आमचा सामूहिक सन्मान आहे. सरकारने सोपवलेली जबाबदारी पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करीन,’ अशी प्रतिक्रिया करवंदे यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणे