जेजुरी: जिल्हा परिषद शाळांतील २०२४-२५च्या शिक्षकांच्या संचमान्यतेनुसार बदली कराव्यात, असा निर्णय शासनाने दिल्यानंतर शिक्षण विभागाकडून तशी कार्यवाही सुरू झाली होती. मात्र, दोन महिने उलटले तरी बदल्या झाल्या नसल्याचे समोर आले आहे. ग्रामविकास विभागाने पुन्हा नव्याने त्यासंदर्भात शुद्धिपत्रक काढल्याने शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या यावर्षी होणार की नाही, अशी साशंकता व्यक्त होत आहे.
शिक्षक ऑनलाइन पोर्टलद्वारे होणाऱ्या बदल्यांसाठी बदली सुधारित धोरण १८ जून २०२४ मधील तरतुदीनुसार पुणे जिल्ह्यातील ४०२५ हजार शिक्षकांच्या बदल्या मे २०२५ मध्ये करण्यासाठी बदली पात्र, बदली अधिकार प्राप्त, अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षकांची अंतिम यादी निश्चिती करून या याद्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात होत्या. यानंतर पुढील टप्प्यात इच्छुक शाळांची नावे भरण्यात आली. तद्नंतर शिक्षक बदल्यांमधील संवर्ग १ ते ७ टप्प्या-टप्प्यानुसार ऑनलाइन पोर्टलद्वारे बदली प्रक्रिया पार पडणार होती. बदली पोर्टलवरील रिक्त पदांची माहिती अद्ययावत करण्यासाठी २८ मेपर्यंत फक्त चार दिवसांच्या कालावधीमध्ये बदली पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अंतिम सूचना ग्रामविकास विभागाने अंतिम शुद्धिपत्रक काढून दिल्या होत्या. या कालावधीमध्ये गट शिक्षणाधिकारी यांनी बदली पोर्टलवरील शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती अद्ययावत केली. गटशिक्षणाधिकारी यांनी अद्ययावत केलेल्या माहितीची पडताळणी करून सदर माहिती शिक्षणाधिकारी यांनी अंतिम केली.विहित केलेल्या कालावधीमध्ये शिक्षक ऑनलाइन बदल्यांची कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असून, याकरिता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, याची सर्व जिल्हा परिषदांच्या नोडल अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी, अशा सक्त सूचना यापूर्वी दिल्या; मात्र त्यावेळी शिक्षकांच्या बदल्या झाल्याच नाहीत.१५ जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होऊन मोठ्या धुमधडाक्यात प्रवेशोत्सव साजरा होऊन शिक्षक आपापल्या आहे त्याच शाळांवर गेले व शाळा सुरू केल्या. मात्र, दोन महिन्यांच्या कालावधीनंतर ऑनलाइन शिक्षक बदल्या होतील की नाही! याबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र, आज पुन्हा नव्याने ग्रामविकास विभागातर्फे शुद्धिपत्रक आले. दोन महिन्यांनंतर पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच फेर आदेश आल्यामुळे आता तरी बदल्या होतील, असा आशावाद बदली प्राप्त शिक्षकांना वाटत आहे. मात्र, अजून तरी शिक्षण विभागाकडून तशा हालचाली होताना दिसत नाही. त्यामुळे बदली प्रकियेबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
आदेशाची अंमलबजावणी झाली नाहीऑनलाइन शिक्षकांच्या बदल्या १ करणाऱ्या विन्सीस आयटी कंपनीने सूचित केल्यानुसार सर्व जिल्हा परिषदांना परिषदांकडून शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत भरलेल्या माहितीमध्ये सुधारणा करणे, नावे वगळणे तसेच नव्याने नावे समाविष्ट करण्याबाबत केलेल्या विनंतीमुळे व जिल्हा परिषदांकडून करण्यात आलेल्या अशा बदलांमुळे पोर्टलवर भरण्यात आलेली रिक्त पदांची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे आदी सूचना देण्यात आल्या आहेत.
3 देण्यात आल्या होत्या.दोन महिन्यांपूर्वीही अशाच सूचना त्यावेळीदेखील अशाच पद्धतीने अंतिम इशारा देत बदल्या करण्याबाबत सक्त आदेश दिले होते. मात्र, सदर आदेशाची अंमलबजावणी झाली नाही.माहिती केली अंतिमगट शिक्षणाधिकारी यांनी बदली पोर्टलवरील शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती अद्ययावत केली. त्यानंतर अद्ययावत केलेल्या माहितीची पडताळणी करून सदर माहिती शिक्षणाधिकारी यांनी अंतिम केली.