शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune : मेदनकरवाडीचा ग्रामसेवक ५ हजार रुपयांची लाच घेताना ACB च्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 12:12 IST

याप्रकरणी एका तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती...

चाकण (पुणे) : सदनिकेची नोंद लावण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई चाकणजवळील मेदनकरवाडी ग्रामपंचायत येथे काल ( दि.१४ ) करण्यात आली. राजाराम दामू रणपिसे (वय. ५५ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. याप्रकरणी एका तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामसेवक राजाराम रणपिसे याने तक्रारदाराला त्यांच्या वडिलांनी खरेदी केलेल्या सदनिकेची नोंद लावण्यासाठी तसेच घरपट्टी जमा करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. मिळालेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाच्या पथकाने मेदनकरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सापळा लावला होता. तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाच घेताना रणपिसे यास रंगेहात पकडले आहे.

चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक भरत साळुंखे आणि प्रवीण निवाळकर करीत आहेत. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपआयुक्त सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी