ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By Admin | Updated: August 18, 2015 23:50 IST2015-08-18T23:50:38+5:302015-08-18T23:50:38+5:30
येथील मावळ पंचायत समिती येथे तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन
वडगाव मावळ : येथील मावळ पंचायत समिती येथे तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे राज्य सरचिटणीस ज्ञानोबा घोणे यांच्या नेतृत्वाखाली मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
तालुक्यातील १०४ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अनेक वर्षांपासून किमान वेतन श्रेणीची अंमलबजावणी, वेतन थकबाकी, जलसुरक्षारक्षक मानधन, गणवेश, रेनकोट, काठी व चार्ज साहित्य व कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिका इत्यादी प्रश्न प्रलंबित असून, राहणीमान भत्ता न दिल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश असूनही कार्यवाही होत नाही.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पंचायत समिती येथे मासिक बैठकीसाठी हॉल व सतरंजी उपलब्ध होत नसल्याने त्या कर्मचाऱ्यांना वाळू व मातीमध्ये बसून बैठक घ्यावी लागते. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न त्वरित सोडविण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.
ग्रामपंचायत कर्मचारी संघ तालुकाध्यक्ष खंडू घोटकुले, जीवन गायकवाड, गणेश वाळुंजकर, राजेंद्र कांबळे, वसंत शिंदे, हरिभाऊ चोरघे, बाळासाहेब मोहिते, अशोक सरवदे, राजू काळोखे, पंढरीनाथ कांबळे व बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.
(वार्ताहर)