शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

सासू-सून झाल्या ग्रामपंचायत सदस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 6:23 AM

चांदे (ता. मुळशी) ग्रामपंचायतीत एकाच घरातील दोन महिलांनी ग्रामपंचायत सदस्य होण्याचा मान कल्पना खानेकर आणि कोमल खानेकर यांनी मिळविला आहे.

पौड : चांदे (ता. मुळशी) ग्रामपंचायतीत एकाच घरातील दोन महिलांनी ग्रामपंचायत सदस्य होण्याचा मान कल्पना खानेकर आणि कोमल खानेकर यांनी मिळविला आहे.चांदे ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत कल्पना जीवन खानेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाली. यापूर्वी २०१५ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कल्पना खानेकर यांच्या सूनबाई कोमल प्रसाद खानेकर या सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळे आता एकाच घरातील सासू व सून सदस्य म्हणून निवडून येण्याचा मान खानेकर परिवाराने मिळवला आहे. नवनिर्वाचित सदस्या कल्पना खानेकर या मुळशी तालुका वारकरी महामंडळाचे अध्यक्ष जीवन खानेकर यांच्या पत्नी आहेत. काँग्रेसचे युवकनेते व चांदे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रसाद खानेकर यांच्या त्या मातोश्री होत.सन २०१५ मध्ये चांदे ग्रामपंचायत निवडणूक सर्वानुमते बिनविरोध झाली होती. या वेळी ठरल्याप्रमाणे कोमल खानेकर यांना एक वर्षानंतर उपसरपंच म्हणून काम करण्याची संधी देण्याचे ठरले होते, परंतु अडीच वर्षे झाली तरी त्यास त्यांना ठरल्याप्रमाणे संधी मिळाली नाही. त्याचदरम्यान काही कारणाने एका सदस्याने मध्येच राजीनामा दिल्याने सदस्यपदाची एक जागा रिक्त झाली. पूर्वी ठरले असूनही उपसरपंच होण्याची संधी न मिळाल्याने प्रसाद खानेकर यांनी या नाराजीतून आपल्या मातोश्रींना निवडणुकीत उतरविण्याचे ठरविले. त्यामुळे या ठिकाणी एका जागेसाठी निवडणूक लागली होती. परंतु, नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत कल्पना खानेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. या वेळी कल्पना खानेकर आणि कोमल खानेकर यांचे चांदे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायतFamilyपरिवार