ग्रामपंंचायत निवडणुकीचे पडघम

By Admin | Updated: July 4, 2017 03:18 IST2017-07-04T03:18:07+5:302017-07-04T03:18:07+5:30

गतवर्षीच्या दिवाळीदरम्यान सुरू होणारा निवडणुकांचा हंगाम यंदा वर्षअखेरपर्यंत चालणार आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद

Gram Panchayat elections fall | ग्रामपंंचायत निवडणुकीचे पडघम

ग्रामपंंचायत निवडणुकीचे पडघम

लोकमत न्यूज नेटवर्क
डोर्लेवाडी : गतवर्षीच्या दिवाळीदरम्यान सुरू होणारा निवडणुकांचा हंगाम यंदा वर्षअखेरपर्यंत चालणार आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर आता जिल्ह्याला ग्रामपंचायत निवडणुकांचे वेध लागलेत. वर्षअखेरीस जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायती निवडणुकीतही विधान परिषदेपासून निवडणुकीचा मोसम सुरू झाला. चार महिने हा मोसम होता. त्यानंतर सहा महिन्यांची वेळ आहे; मात्र आतापासूनच ग्रामपंचायत निवडणुकीची चर्चा सुरू झाली.
ग्रामपंचायत निवडणुका या पक्षीय पातळीवर लढल्या जात नाहीत. मात्र, येथे कोणत्या गटाची किंवा पक्षाच्या नेत्यांची सत्ता आहे, हे सहजपणे ओळखता येते. तसेच आता या वर्षी जरा वेगळ्या प्रमाणे निवडणूक आयोगाने आरक्षण केले आहे. पुणे जिल्ह्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पहिल्यांदाच ग्लोबल इन्फॉर्मेशन मॅप (जीआयएस) आणि गुगल अर्थच्या नकाशांवरून प्रभागरचना केली गेली आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटरच्या नकाशांचा आधार घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत शाखेकडून प्रभागरचना आणि आरक्षणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटर (एमआरएसएसी) आणि गुगल अर्थच्या नकाशांची समांतरजुळणी (सुपर इम्पोज) करून लोकसंख्या आणि क्षेत्रफळानुसार ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभागरचना केली आहे. गुगल नकाशांनुसार तहसीलदारांनी एमआरएसएसी नकाशांची समांतर जुळणी केली आहे. हे करताना नकाशांमध्ये रस्ते, नदी, ठळकपणे दर्शविण्यात आले.

२०११ च्या जनगणनेनुसार होणार रचना

1 ग्रामपंचयात क्षेत्रातील वाडी, वस्ती, पाडे वगळणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रभागरचना करताना ग्रामपंचायतींची २०११मध्ये झालेल्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या भागिले ग्रामपंचायतींची एकूण सदस्यसंख्या, या सूत्रानुसार प्रभागांची लोकसंख्या निश्चित करू, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

2यंदा प्रथमच जीआयएस आणि गुगल अर्थच्या नकाशांवर आधारित प्रभागरचना केली. यापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तलाठी कार्यालय स्तर नकाशांवर प्रभागरचना केली जात होती. त्यामुळे प्रभागरचनेत लोकसंख्या, क्षेत्रफळानुसार अचूकता येत नव्हती. प्रभागरचनेवर अनेक आक्षेप नोंदविले जात होते.

गुगल अर्थ व जीआयएस नकाशांद्वारे प्रभागरचना केल्याने अचूकता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभागरचनेनंतर जातीनिहाय आरक्षणदेखील जाहीर केले आहे.

ग्लोबल इन्फॉर्मेशन मॅप (जीआयएस)च्याच साह्याने डोर्लेवाडीमध्येही मॅपिंग केले गेले व प्रभागरचनेनंतर जातीनिहाय आरक्षण सोडत काढली गेली.

Web Title: Gram Panchayat elections fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.