ग्रामपंचायतीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पँनल मध्ये लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:26 IST2021-01-13T04:26:55+5:302021-01-13T04:26:55+5:30
मागिल पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन पँनलने एकमेकां विरोधात निवडणुक लढवली होती. या वेळीही तशाच पध्दतीने ...

ग्रामपंचायतीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पँनल मध्ये लढत
मागिल पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन पँनलने एकमेकां विरोधात निवडणुक लढवली होती. या वेळीही तशाच पध्दतीने दोन पँनेलमध्ये लढत होत आहे. मागिल वेळी काँग्रेसच्या पँनलला सर्वाधीक जागा मिळाल्याने तब्बल ३० वर्षांनी ग्रामपंचायतीची सत्ता काँग्रेसला मिळाली होती. यावेळी पुन्हा काँग्रेसने ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी
प्रयत्न करित आहेत. तर राष्ट्रवादीने मागिल पंचवार्षिक मध्ये
अंर्तगत चुकांमुळे ३० वर्षांची सत्ता गमवली होती. ती पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
२०१६ सालच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भोंगवली ग्रामपंचायतीत सत्ता मिळवल्यानंतर गावातील महत्त्वाची कामे करण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा काँग्रेसचा भैरवनाथ विकास पँनलकडून प्रचार सुरु आहे. तर राष्ट्रवादीचा जय तुळजा भवानी परिवर्तन पँनलकडुनही बँनर, पोस्टर लावुन घरोघरी जाऊन प्रचार सुरु आहे. प्रचार शिगेला पोहचला आहे. सत्ताधारी पँनल आपली सत्ता राखण्यासाठी तर परिवर्तन पँनल ग्रामपंचायतीची सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करित आहेत. त्या दृष्टीने दोन्ही पँनलकडुन प्रयत्न सुरु आहेत. भैरवनाथ विकास पँनल उमेदवार खालील प्रमाणे
प्रभाग १ - पुनम सुर्वे, जीवन निगडे, शितल निगडे. प्रभाग २ - अरुण पवार, कृष्णा लंके, रेखा जाधव. प्रभाग ३- महादेव शिनगारे, अनुराधा शेडगे, चित्रा भांडे. जय तुळजा भवानी परिर्वतन पँनल उमेदवार - प्रभाग १- प्रवीण सुर्वे, मंदाकिनी कुंभार, अश्विनी चव्हाण. प्रभाग २ - संतोष बाठे, संदीप भांडे, स्वाती निगडे. प्रभाग ३ - गणेश मोरे, अश्विनी सुर्वे, पुष्पलता खुटवड.