जीपीएसमुळे चोरटय़ांचा शोध

By Admin | Updated: June 29, 2014 22:47 IST2014-06-29T22:47:07+5:302014-06-29T22:47:07+5:30

मुंबईमधून मोटार चोरून पळून जात असलेल्या दोन वाहनचोरांना स्वारगेट पोलिसांनी शिताफीने अटक केली. मोटारीमध्ये जीपीएस यंत्रणा होती.

GPS search of thieves due to GPS | जीपीएसमुळे चोरटय़ांचा शोध

जीपीएसमुळे चोरटय़ांचा शोध

>पुणो : मुंबईमधून मोटार चोरून पळून जात असलेल्या दोन वाहनचोरांना स्वारगेट पोलिसांनी शिताफीने अटक केली. मोटारीमध्ये जीपीएस यंत्रणा होती. त्याच्या आधारेच स्वारगेट पोलिसांनी चोरटय़ांना पकडले. या चोरटय़ांकडून चोरीची मोटार जप्त करण्यात आली असून, त्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी दिली.
जाकीर हुसेन  शेख ( वय 26, रा. नेहरुनगर, कुर्ला) व सय्यद शमशेर निजामवालीया (वय 66, रा. अलकत्ता बिल्डिंग, मुंब्रा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. मुंबईमधून एक आलिशान मोटार चोरीला गेली असून, चोरटे ही मोटार घेऊन पुण्यात आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याबाबतचा नियंत्रण कक्षाकडून कॉल मिळाल्यावर उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट परिसरात नाकेबंदी करण्यात आली. 
वरिष्ठ  पोलीस निरीक्षक दीपक निकम यांच्या सूचनांनुसार सहायक निरीक्षक एस. ए. केंजळे, पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर, रूपेश गेंगजे, नीलेश चव्हाण, कपिल माने, प्रकाश खुटवड, दीपक मोदे यांनी हद्दीमध्ये मोटारीचा शोध घेण्यास सुरुवात केली. जेधे चौकासह सारसबाग, सोलापूर रस्ता आणि सातारा रस्त्यावर वाहनांची तपासणी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, जेधे चौकामध्ये लावलेल्या सापळ्यात एक संशयास्पद मोटार अडकली. 
मोटारीतील शेख व निजामवालीया यांच्याकडे मोटारीच्या मालकीसंदर्भात चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केल्यावर ही मोटार चोरीची असल्याची कबुली आरोपींनी दिली. मोटारीच्या मूळ  नंबर प्लेटवर एपी क्4, एएफ 8276 ही बनावट नंबर प्लेट लावण्यात आलेली होती. मोटारीचा मूळ क्रमांक एमएच क्4, ईएस 83क्7 असा आहे. ही 
मोटार चारबंगला वर्सोवा येथून चोरण्यात आली होती. एका कंपनीच्या पार्किगमधून बनावट चावीचा वापर करुन मोटार लांबवण्यात आली होती.(प्रतिनिधी)
 
जीपीएस सिस्टीम महत्त्वाची
या मोटारीमध्ये जीपीएस सिस्टीम होती. त्यामुळे आरोपींचा मार्ग पोलिसांना समजत होता. ही मोटार पुण्याच्या दिशेने आल्यावर पुणो पोलिसांना वायरलेसवर कळविण्यात आले. पोलिसांनी शहरात वाहन तपासणी सुरू केल्यानंतर ही मोटार टिळक रस्त्यावर आली. टिळक रस्त्यावरून जेधे चौकात येताच स्वारगेट पोलिसांच्या पथकाने मोटार ताब्यात घेतली. 

Web Title: GPS search of thieves due to GPS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.