अस्वस्थ करणा-या घटनांमुळे समाजात एकप्रकारचे भीतीचे वातावरण - गोविंद निहलानी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 08:15 PM2017-09-16T20:15:09+5:302017-09-16T20:15:17+5:30

ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी आजची वास्तविकता समाजासमोर येईल असे चित्रपट निर्माण होण्याची गरज व्यक्त केली.

Govind Nihalani, a fear-stricken environment in society due to uncomfortable incidents | अस्वस्थ करणा-या घटनांमुळे समाजात एकप्रकारचे भीतीचे वातावरण - गोविंद निहलानी 

अस्वस्थ करणा-या घटनांमुळे समाजात एकप्रकारचे भीतीचे वातावरण - गोविंद निहलानी 

Next

पुणे, दि. 16 -  अस्वस्थ करणाऱ्या घटनांमुळे समाजात एकप्रकारचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजात नक्की काय चाललंय हे कुणीच समजू शकलेले नाही. ते जाणून घ्यायचे झाल्यास धोका पत्करावा लागतो आणि ते धाडस केले तर शांतीपूर्ण जीवन कदाचित जगू शकणार नाही अशी धास्ती लोकांना वाटते, अशा शब्दात समाजातील मानसिकतेवर बोट ठेवत ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी आजची वास्तविकता समाजासमोर येईल असे चित्रपट निर्माण होण्याची गरज व्यक्त केली.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय व फेडरेशन आॅफ फिल्म सोसायटीज आॅफ इंडिया यांच्यातर्फे आयोजित रसास्वाद सिनेमाचा या शिबिराच्या समारोप वेळी ते बोलत होते. संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक श्यामला वनारसे, सुषमा दातार आणि समन्वय सतीश जकातदार उपस्थित होते. गोविंद निहलानी यांच्या ती आणि इतर या चित्रपटाच्या अंगाने यावेळी चर्चा झाली. 

जेव्हा कधी अस्वस्थ करणाऱ्या घटना घडतात तेव्हा समाज हा पूर्णतः गोंधळलेल्या आणि भयग्रस्त वातावरणात असतो. शोषण आणि गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात  आपल्याला आवाज तर उठवायचा असतो पण अपल्याला किन्वा कुटुंबाला काही होणार तर नाही ना? याची धास्ती  कायम असते.वास्तविक जगाला तोंड देणे इतके सोपे नसते, अशी समाजाची मानसिक अवस्था त्यांनी नेमकेपणे मांडली.

चित्रपट आणि नाटक यात विशेष फरक नसल्याचे सांगून निहलानी पुढे म्हणाले की समांतर चित्रपट आला तेव्हा हे नाटक आहे की चित्रपट ही चर्चा व्हायची. संवाद जास्त , एकाच ठिकाणचे दृष्य नसणे म्हणजे चित्रपट असे समजले जायचे. चित्रपट माध्यमाची जी बलस्थाने आहेत, त्याचा वापर व्हावा असा मतप्रवाह होता. मात्र फॉर्म कोणताही असो त्यातील आशय आणि मांडणी महत्वपूर्ण असते. जसे चित्र एक रंगाने काय किंवा पन्नास रंगांनी रंगविले तरी  त्यातून व्यक्त होणे गरजेचे असते.  आज दोन्ही माध्यमातील अंतर कमी झाले आहे. चांगल्या ठिकाणचे चित्रीकरण आणि मोठे कॅमेरे हे गरजेचेच असते असे नाही. माध्यम कुठलेही असले तरी त्यातून प्रभावशाली कलाकृती समोर येणे आवश्यक आहे. समारोपानंतर शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्रे देण्यात आली. 
 

Web Title: Govind Nihalani, a fear-stricken environment in society due to uncomfortable incidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.