गोविंद मांगडे ठरला ‘लाल मातीचा राजा’

By Admin | Updated: February 17, 2016 01:06 IST2016-02-17T01:06:09+5:302016-02-17T01:06:09+5:30

येथील पुरंदरच्या लाल मातीचा राजा कुस्ती स्पर्धेत मांगडेवाडीचा पैलवान गोविंद मांगडे याने सासवडच्या पैलवान रघुनाथ जगताप याला चितपट करीत पुरंदरच्या लाल मातीचा राजा किताब पटकावला

Govind Mangade was the King of Lal Mati | गोविंद मांगडे ठरला ‘लाल मातीचा राजा’

गोविंद मांगडे ठरला ‘लाल मातीचा राजा’

नारायणपूर : सासवड (ता. पुरंदर) येथील पुरंदरच्या लाल मातीचा राजा कुस्ती स्पर्धेत मांगडेवाडीचा पैलवान गोविंद मांगडे याने सासवडच्या पैलवान रघुनाथ जगताप याला चितपट करीत पुरंदरच्या लाल मातीचा राजा किताब पटकावला. सुमारे २० ते २५ मिनिटे गोविंदने रघुनाथवर पकड ठेवली होती. एकेरीकस या डावावर गोविंदने रघुनाथला चितपट करीत मानाचा ‘पुरंदरच्या लाल मातीचा राजा’ किताब व चांदीची गदा पटकावली. जि. प. सदस्य पैलवान कुलदीप कोंडे यांनी या कुस्तीचे पंच म्हणून काम पाहिले.
पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड व पुरंदर तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने सासवड येथील भैरवनाथ कुस्ती आखाड्यामध्ये या स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या. माजी आमदार चंदुकाका जगताप, युवानेते संजय जगताप, सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते यांच्या हस्ते पैलवान गोविंद मांगडे याला २१ हजार रुपये रोख, प्रशस्तिपत्रक, चांदीची गदा आणि मानाचा ‘पुरंदरच्या लाल मातीचा राजा’ किताब, तर उपविजेता पैलवान रघुनाथ जगताप याला १५ हजार रुपये रोख, प्रशस्तिपत्रक व ट्रॉफी देण्यात आली.
याप्रसंगी आॅलिम्पिक वीर ज्येष्ठ मल्ल मारुती आडकर, डबल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी, दत्ता गायकवाड, मेघराज कटके, पंडित साबळे, मनोज मांगडे, नीलेश खटाटे, राहुल जगताप, नितीन मोडक, विजय साबळे, रोहित काळे, अक्षय मोडक, राजेश जांभळे, तसेच नंदकुमार जगताप, दत्ता झुरंगे, सुहास लांडगे, अजित जगताप, संदीप जगताप, मनोहर जगताप, योगेश गिरमे, कैलास जगताप, तसेच दत्तात्रय गवळी, गणेश मेमाणे, पिनूशेठ काकडे, नितीन दिघे, संदीपबापू जगताप, विक्रम जगताप, जयसिंग जगताप, बाबूराव दिघे, दादा काळे, संजयनाना जगताप, अण्णा काळे, तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: Govind Mangade was the King of Lal Mati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.