शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

सत्तेसाठी सरकार दंगली घडवेल, अजित पवारांंची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 00:10 IST

माळेगाव येथे जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्या प्रयत्नातून विविध लाभांच्या वस्तूंचे वाटप व भूमीपुजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्या कामाचे देखील पवार यांनी कौतुक केले.

बारामती : ‘‘शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजारांची मदत हा जुमला आहे. देशात घडणाºया विविध घटना पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी छुप्या पद्धतीने हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. सत्तेसाठी हे सरकार देशात दंगली घडवतील, अशी घणाघाती टिका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

माळेगाव येथे जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्या प्रयत्नातून विविध लाभांच्या वस्तूंचे वाटप व भूमीपुजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्या कामाचे देखील पवार यांनी कौतुक केले. पवार पुढे म्हणाले, पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला हा देशाच्या अस्मितेवरील हल्ला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकरी विरोधी धोरण चुकिचे आहे. तेलंगणात राबविलेली शेतकरी सन्मान योजना शेतकरी हिताची आहे. तेथे शेतकºयांना विस हजार वार्षिक मदत केली जाते. मात्र केंद्र सरकारची शेतकरी सन्मान योजना म्हणजे जुमलेबाजी आहे. गॅस दरवाढीने सर्वसामान्य यांचे कंबरडे मोडले आहे. तसेच घटना जाळणे किंवा बदल करणे हा छुपा अजेंडा आहे. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्रीला उपोषण करावे लागणे हे देशाच्या इतिहासात प्रथम घडले आहे, अशी टिका पवार यांनी केली. यावेळी सभापती संजय भोसले, रोहिणी तावरे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविराज तावरे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, बारामती टेक्साटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, सभापती संजय भोसले, बांधकाम आरोग्य सभापती प्रविण माने, संभाजी होळकर, राणी शेळके, सुजाता पवार, तालुक्यातील विविध संस्थाचे पदाधिकारी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार सचिन तावर यांनी मानले.समविचारी पक्षांना घेऊन निवडणुका लढवणार...स्वबळाची भाषा करणारी शिवसेना व भाजपची युती नक्की होणार आहे. आम्ही देखील समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुक लढवणार आहोत. सध्या दुष्काळाचे संटक गंभीर आहे. मात्र या शासनाने दुष्काळ निवारणासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. जनावरांच्या चारा छावण्या, दुध दर, फसलेली कर्जमाफी या सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी ठरले आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणे