शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांना शेतक-यांच्या प्रश्नांविषयी अनास्था - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 01:12 IST

‘दोन हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतक-यांना ६ हजार रुपये देऊन, शेतक-यांना तुकडा देऊन, राज्यातील व केंद्रातील सरकार शेतक-यांची चेष्टा करीत आहे.

इंदापूर - ‘दोन हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतक-यांना ६ हजार रुपये देऊन, शेतक-यांना तुकडा देऊन, राज्यातील व केंद्रातील सरकार शेतक-यांची चेष्टा करीत आहे. त्यामुळे राज्यात व शेतक-यांविषयी आस्था नसलेले सरकार आले आहे. शेतक-यांची अशी चेष्टा करणा-यांना आम्ही सोडणार नाही,’ असा टोला देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी भाजपा सरकारला लगावला.इंदापूर बाजार समितीने आयोजित केलेल्या शरद कृषी महोत्सव-२०१९ च्या बक्षीस वितरण व व्यापारी गाळ्यांच्या उद्घाटनप्रसंगी शरद पवार बोलत होते. या वेळी माढा विधानसभा आमदार बबनदादा शिंदे, करमाळा आमदार नारायण पाटील, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजन पाटील, सोनाई परिवाराचे सर्वेसर्वा दशरथ माने, मंगलसिद्धी परिवाराचे प्रमुख राजेंद्र तांबिले, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, कार्याध्यक्ष अमोल भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.शरद पवार म्हणाले की, शेतकºयांना सन्मानाने जगता यावे, यासाठी शेतीमालाला हमीभाव दिला पाहिजे; मात्र या सरकारने शेतकºयांना अर्थसंकल्पात तुकडा देऊन भीक दिली आहे. आमचा शेतकरी भीक स्वीकारणार नसून, सन्मानाने जगणार आहे. या सरकारने शेतकºयांचे हाल केल्यामुळे देशाच्या इतिहासात सर्वाधिक शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत.यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे यांची भाषणे झाली. यावेळी संचालक शिवाजीराव इजगुडे, पुणे जिल्हा परिषेदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, सदस्य अभिजित तांबिले, इंदापूर बाजार समितीचे सर्व संचालक व्यापारी, शेतकरी आदी मान्यवर व नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी इंदापूर बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी प्रास्ताविक केले, तर उपसभापती यशवंत माने यांनी आभार मानले.आघाडी सरकारच्या काळात शेतकºयांच्या आत्महत्यावर तोडगा काढण्यासाठी मंत्रिमंडळात चर्चा करून, दहाच दिवसांत आम्ही ७१ हजार कोटींची कर्जमाफी दिली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPuneपुणेGovernmentसरकारPoliticsराजकारण