शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"सरकारला पाडायला ताकद लागते..! जयंत पाटलांनी ते करून दाखवावं" - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 13:50 IST

भाजपचे कार्यकर्ते लोकांची सेवा, अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि निवडणूक यासाठी बांधील आहे

पुणे : एखादा विषय मार्गी लागेपर्यंत थांबलो नाही हा आमचा संघर्ष आहे. असा संघर्ष करून अजित पवार आमरण उपोषणाला बसले ते बघणं महाराष्ट्राला आवडेल. जयंत पाटील यांनी म्हणत रहावं सरकार पडेल म्हणून. सरकारला पाडायला ताकद लागते. जयंत पाटलांनी ते करून दाखवावं असे आव्हान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. 

पाटील म्हणाले,  भाजपचे कार्यकर्ते लोकांची सेवा, अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि निवडणूक यासाठी बांधील आहे. गेले अडीच वर्षे आम्ही संघर्ष केला. सरकारला झोपू दिलं नाही. वर्षानुवर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीचा संघर्ष डीएनएच नाहीये. सरकारला पाडायला ताकद लागते. जयंत पाटलांनी ते करून दाखवावं. 

अंधेरी निवडणुकीबाबत बोलताना पाटील म्हणाले, लोकशाहीमध्ये कोणी कोणावर काय आरोप करायचे यावर बंधन आणता येत नाही. अंधेरीमध्ये लोकांची मानसिकता काय आहे कळत नाही. त्यामुळे लोकांचं मी सांगू शकत नाही. नोटाला का मतदान झालं कळत नाही. 

जसा निधी उपलब्ध होईल तशी त्यांच्याही कामांना यादीत स्थान दिले जाईल

नाना पटोले यांना लोक गांभीर्याने घेत नाहीये. पुण्यात नियोजन बैठकीमध्ये आमच्यावेळी विरोधी आमदारांना कमी निधी देऊन तोंडाला पाणी पुसले होते. त्यामुळे मी अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे आणि सुनील शेळके यांचे निधी कमी केले. पण त्यांचेही अंदाजपत्रक सेव्ह करायला सांगितले आहे.  जसा निधी उपलब्ध होईल तशी त्यांच्याही कामांना यादीत स्थान दिले जाईल. कारण आमची सत्ता आली, निधी तर द्यावा लागेल. 'मातोश्री' किंवा 'वर्षा'मध्ये जाऊन कोणी सभा घेऊ शकत नाही. त्यामुळे अंगणात घ्यायला काय हरकत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.  

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलJayant Patilजयंत पाटीलNana Patoleनाना पटोलेPoliticsराजकारण