शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

पुण्याच्या पिण्याच्या पाण्यातील प्रदुषणाबाबत सरकार उदासीन    

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 10:00 PM

स्थानिक बडे लोक व बांधकाम व्यावसायिकांचे हे संगनमत

ठळक मुद्देकसलीच कारवाई नाही : शुद्धीकरणानंतरही सार्वजनिक आरोग्याला धोकाप्रदूषण करणाऱ्यांविरोधात कारवाई करून ते रोखण्याची जबाबदारी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची सार्वजनिक उपयोगाचे पाणी प्रदूषणाविरोधात संबंधितांवर कारवाई करण्याचे अधिकार

पुणे : खडकवासला धरणाच्या भोवतालची गावे  पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या अखत्यारित येतात. धरणातप्रदूषण करणाऱ्यांविरोधात कारवाई करून ते रोखण्याची जबाबदारी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची असते. मात्र या दोन्ही यंत्रणा खडकवासल्यातील मैलापाण्याचे प्रदूषण थांबवण्याबाबत उदासीनच असल्याचे दिसले आहे.

पुण्याला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या खडकवासला धरणाभोवती गोऱ्हे खुर्द, गोऱ्हे बुद्रुक, डोणजे, खानापूर, गिरीनगर, ओसाडे, कडजे, मांडवी, सांगरून, गावकोस अशी अनेक गावे आहेत. ही बहुतेक गावे पीएमआरडीएच्या अखत्यारित आहेत. सांडपाणी, मैलापाणी व्यवस्थापनाचा आराखडा दिल्याशिवाय या गावांमधल्या कोणत्याही बांधकामाला परवानगी देता येत नाही. मात्र तरीही या गावांमध्ये अनेक निवासी, व्यावसायिक इमारतींना ‘पीएमआरडीए’ने परवानगी दिली आहे.या सर्व इमारतींचे मैलापाणी धरणात मिसळत आहे. मात्र त्याबाबत कोणतीही कारवाई केली जात नाही. काही जणांनी शोष खड्यांमध्ये सांडपाणी जिरवण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र तेही अंतिमत: धरणाच्या प्रदूषणाचे कारण ठरत आहे. बांधकामाची परवानगी मिळवताना सादर केलेल्या तरतुदींची पूर्तता केली नसल्यास त्यावर कारवाई करण्याचे अधिकार पीएमआरडीएला आहेत. मात्र अशीही कारवाई या कार्यालयाने केलेली नाही. धरणात दूषित पाणी सोडले जात आहे, म्हणून कारवाई केल्याचे एकही उदाहरण नाही. बांधकामाच्या परवानग्या मात्र सर्रास दिल्या जात आहेत.सार्वजनिक उपयोगाचे पाणी प्रदूषणाविरोधात संबंधितांवर कारवाई करण्याचे अधिकार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहेत.

पुण्यातील त्यांच्या कार्यालयातून दिवसभरात कोणीही दूरध्वनी घेतला नाही, मात्र या खात्यानेही कधीच खडकवासला परिसरात तपासणी केली नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. धरणात दूषित पाणी सोडणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांकडून स्थानिकांना धमकावले जाते. स्थानिक बडे लोक व बांधकाम व्यावसायिकांचे हे संगनमत आहे. गावांतील मृतांचे अंत्यसंस्कारही धरणाच्या बाजूलाच केले जातात. अन्य धार्मिक विधींचे निर्माल्यही थेट धरणात टाकले जात असल्याचे येत असल्याचे या नागरिकांनी सांगितले.        

टॅग्स :PuneपुणेDamधरणpollutionप्रदूषणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका