शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune: तळजाई परिसरात गुंडांनी माजविली दहशत; पार्क केलेल्या ४० हून अधिक गाड्यांची तोडफोड

By विवेक भुसे | Updated: June 20, 2023 09:39 IST

त्यामुळे संपूर्ण परिसरात दहशत निर्माण झाली आहे...

पुणेपूर्ववैमनस्यातून एका दुश्मनाला शोधण्यासाठी आलेल्या ६ जणांच्या टोळक्याने तळजाई परिसरातील वनशिव वस्तीमध्ये पहाटे धुमाकूळ घालत दहशत पसरविली. रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ४० हून अधिक वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे संपूर्ण परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

तोंडाला रुमाल बांधलेले ६ जणांच्या गुंडांच्या टोळक्याने या वसाहतीत पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास प्रवेश केला. त्यांनी एका पाठोपाठ एक गाड्यांवर दगडफेक करीत हातातील कोयते, लोखंडी गज, लाठ्यांचा मारा केला. वाहनांच्या काचा फोडत आरडाओरडा करत हे टोळके गोंधळ घालत होते. त्यांच्यामुळे कोणाचीही घराबाहेर पडण्याची हिंमत झाली नाही. त्यांनी काही घरांवरही दगडफेक केली. या घटनेत १० ते १५ रिक्षा, २५ दुचाकी, काही कार यांचे नुकसान झाले आहे.

याबाबत पोलीस उपायुक्त र्स्मातना पाटील यांनी सांगितले की, हे गुंड वारजे पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. एकाला शोधण्यासाठी ते या वसाहतीत आले होते. तो न मिळाल्याने त्यांनी वसाहतीत तोडफोड केली. या टोळक्याची ओळख पटली असून त्यांचा शोध घेऊन अटक करण्याचे काम सुरु आहे.

टॅग्स :PuneपुणेTaljai Tekdiतळजाई टेकडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस