शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

तीन वर्षांपासून फरार असलेला गुंड बाळा दराडे अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 14:44 IST

बारामती पोलिसांनी नाशिकमधून घेतले ताब्यात

ठळक मुद्देपुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात दहशत माजवली होती दहशत

बारामती: गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेला व पन्नास हजार रुपयांचे बक्षिस असलेला गुंड बाळा दराडे याला अखेर बारामती तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे. नाशिक मध्ये बारामती तालुका पोलिसांच्या विशेष गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. दराडे याने पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात दहशत माजवली होती. पिस्तुलांची तस्करी करून युवकांना गुन्हेगारी क्षेत्रात आणण्याचा उद्योग तो गेल्या काही वर्षांपासून करत होता. त्यामुळे दराडे गँग या भागात दहशत निर्माण झाली होती.  एमआयडीसीतल्या व्यापाऱ्यांना, उद्योजकांना धमकावून खंडणी वसूल करणे याशिवाय चोरी, दरोडा, मारामारी असे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल होते. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर आणि भिगवण परिसरात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. मात्र कोणत्याही गुन्ह्यात त्याला अद्याप अटक झालेली नव्हती. गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना चकमा देत तो राज्यात विविध भागात लपून राहत होता. 

अखेर बारामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गव्हाण यांना गुंड बाळा दराडे नाशिक मध्ये एकाच्या मदतीने राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ढवाण यांच्यासह विशेष गुन्हे शोध पथकाचे प्रमुख योगेश लंगोटे आणि त्यांच्या साथीदारांना नाशिकला रवाना करत दराडे याच्या मुसक्या आवळल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून फरार असल्याने पोलिस अधीक्षकांनी दराडे याच्यावर ५० हजार रुपयांचे इनाम देखील घोषित केले होते. अखेर बारामती तालुका पोलीसांच्या विशेष गुन्हे शोध पथकाने ही कामगिरी फत्ते केली आहे. या कामगिरीत पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे, पोलीस कर्मचारी विजय पांढरे, विजय वाघमोडे, नंदू जाधव, विनोद लोखंडे यांनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस