शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहतुकीबरोबर स्कूलबस राहणार बंद : देशव्यापी चक्का जाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 20:23 IST

संपूर्ण देशात टोलमुक्ती , डिझेल दर समान, सर्व प्रकारच्या बस आणि पर्यटक वाहनांना राष्ट्रीय वाहतूक परवाना मिळावा अशा विविध मागण्यांसाठी बेमुदत देशव्यापी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदेशव्यापी चक्का जाम आंदोलन : स्कूल बस संघटना शुक्रवारचा दिवस पाळणार संप स्कूल बस, इंटरसिटी आणि खाजगी कंपनीसाठी सेवा देणाऱ्या संघटनेने सक्रिय पाठिंबा जाहीर

पुणे : आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने शुक्रवारपासून (दि. २०) पुकारलेल्या बेमुदत देशव्यापी चक्का जाम आंदोलनाला स्कूल बस, इंटरसिटी आणि खाजगी कंपनीसाठी सेवा देणाऱ्या संघटनेने सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. मालवाहतुकदारांच्या आंदोलनात एक दिवस सहभागी होणार असल्याचे स्कूल बस संघटनेकडून सांगण्यात आले. डिझेलची किंमत कमी करुन, देशभरातील डिझेल दर समान करावा, संपूर्ण देशात टोलमुक्ती करावी, थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम कमी करावा, टीडीएस, प्राप्तीकर आणि ई वे बिलातील जाचक अटी वगळाव्यात, जड वाहनांना दोन चालकांची सक्ती करु नये, सर्व प्रकारच्या बस आणि पर्यटक वाहनांना राष्ट्रीय वाहतूक परवाना मिळावा अशा विविध मागण्यांसाठी मालवाहतुकदारांबरोबरच इतर वाहतूक संगघटनाही आंदोलनात सक्रिय सहभागी झाल्या आहेत. या आंदोलनाच्या पार्वभूमीवर मालवाहतूकदार, स्कूल बस संघटना, पुणे डिस्ट्रीक्ट लक्झरी बस असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची गुरुवारी (दि. १९) बैठक झाली. त्यात या तीनही संघटनांनी मालवाहतुकदारांच्या संपात सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेतला. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील स्कूल बसचालक शुक्रवारच्या संपात सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली. पुणे बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे म्हणाले, विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये या साठी स्कूल बस चालक या संपात शुक्रवारचा दिवस सहभागी होतील. वाहतुक व्यवसायासंबंधीच्या मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात आंदोलन तीव्रतेने करण्यात येईल मालवाहतूकदारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य मार्ग परिवहन व स्थानिक वाहतुक सेवेतील बसचा वापर करण्यात यावा. तसे, दूध, भाजीपाला, अन्नधान्य, डिझेल, पेट्रोल, गॅस आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील यादी दक्षता घेण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोटार वाहने अधिनियमांतर्गत राज्यातील सर्व प्रकारच्या वाहने, तसेच कंत्राटी व टप्पा वाहतूक करणाऱ्या बस यामधून मालवाहतुकीस आांदोलन काळापुरती परवानगी देण्यात आली आहे. गृहविभागाने तशी अधिसूचना काढली आहे. 

 

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStrikeसंपGovernmentसरकारcongressकाँग्रेस