शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; शहरात ३ सप्टेंबरपासून धावणार पीएमपी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 11:21 IST

पहिल्या टप्प्यात २५ टक्केच म्हणजे ४२१ बसेस १३ डेपोंच्या माध्यमातून १९० मार्गांवर धावणार

ठळक मुद्देबससेवा सुरू करण्याबाबत महापौर दालनात गुरूवारी बैठक आयोजित

पुणे : गणेशोत्सवाच्या कालावधीत होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी, गणेशोत्सवानंतर म्हणजेच ३ सप्टेंबरपासून पीएमपीएमएलची बससेवा सुरू करण्यात येणार आहे. परंतु, पहिल्या टप्प्यात २५ टक्केच म्हणजे ४२१ बसेस १३ डेपोंच्या माध्यमातून १९० मार्गांवर धावणार आहेत.        लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर १ जूनपासून शहरात नागरिकांची वर्दळ वाढली. मात्र ज्यांच्याकडे खाजगी वाहने नाहीत अशा चाकरमान्यांची व प्रवाशांची गैरसोय होत असल्याने, बससेवा सुरू करण्याबाबत  महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या दालनात गुरूवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गणेशोत्सवामध्येच बससेवा सुरू करण्याबाबत काहींनी मागणी केली.पण गणेशोत्सवात होणारी गर्दी टाळावी याकरिता ३ सप्टेंबरपासूनच बससेवा सुरू करावी अशी भूमिका प्रशासनाने मांडली. या बैठकीस पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे, दोन्ही महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने व  संतोष लोंढे, पुणे  मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर,  पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप व आदी अधिकारी उपस्थित होते.    ३ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या बसेसवेत महामंडळाकडील एकूण १३ डेपोच्या १९० मार्गांवर ४२१ बसेसचे संचालनाचे नियोजन आहे. शहरातील प्रमुख रस्ते उपनगरे येथे गर्दीच्या वेळी सकाळ / सायंकाळी पीएमपीएमएल शटल सेवा सुरू करण्यात येणार असून, अधिक गर्दीच्या मार्गांना या मध्ये प्राधान्य दिले गेले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आसन क्षमतेच्या ५०% प्रवाशांनाच सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी बसेसमध्ये सीटवर मार्कींग पेटींग करण्यात आलेले आहे. तसेच महत्वाचे स्थानकावर वर्तुळ पेंट करण्याचे काम सध्या सुरू आहे. ----------------------------------- 

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवPMPMLपीएमपीएमएलshravan hardikarश्रावण हर्डिकरMayorमहापौर