शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांसाठी खुशखबर! जानेवारी अखेरीस धावणार दोन्ही मेट्रो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 14:51 IST

महामेट्रोच्या वतीने दोन्ही शहरांमधील प्राधान्य मार्गांचे काम पूर्ण होत आले आहे...

पुणे: जानेवारीच्या अखेरीस पुणेकरपिंपरी-चिंचवडकरांचे (pune pimpri chinchwad metro) पाय मेट्रोला लागतील. महामेट्रोच्या वतीने दोन्ही शहरांमधील प्राधान्य मार्गांचे काम पूर्ण होत आले आहे. केंद्र व राज्य सरकारकडून उद्घाटनाची वेळ जाहीर केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या तारखेवर उद्घाटनाची वेळ अडली आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय व पिंपरी- चिंचवड महापालिका ते फुगेवाडी या दोन मेट्रो मार्गांचे काम आता ९५ टक्के पूर्ण झाले आहे. किरकोळ कामे लवकरच पूर्ण होतील. त्यानंतर दोन्ही मार्ग ऊदघाटनासाठी सज्ज असतील अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी मंगळवारी दिली.

ऑनलाईन संवाद साधत दीक्षित यांनी स्थानकातील सुविधा, मेट्रोचे डबे तसेच अन्य अनेक बाबतीत पुणे मेट्रो जागतिक मेट्रोशी स्पर्धा करत असल्याचा दावा केला. पुणेकरांना सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा पुणे मेट्रोकडून मिळतील असे त्यांनी सांगितले. प्रकल्प संचालक अतूल गाडगीळ हे प्रत्यक्ष तर जनसंपर्क संचालक हेमंत सोनवणे हे ऑनलाईन सहभागी होते. 

फक्त तिकिटांमधून मिळणारे ऊत्पन्न तोकडे असेल हे लक्षात घेऊन महामेट्रोने आधीपासूनच ऊत्पन्नाचे मार्ग शोधलेत. वनाज, स्वारगेट या ठिकाणी मोठी व्यापारी संंकूले बांधण्यात येत आहेत. राज्य सरकारने टीओडी (ट्रांझिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट) कायदा करून महामेट्रोला मुद्रांक शुल्कातील काही वाटा मिळेल अशी तरतुद केली असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. याशिवाय स्थानकांचे ब्ँडिंग, त्यावरील जाहिराती यातूनही मेट्रोला चांगले आर्थिक ऊत्पन्न मिळेल असे ते म्हणाले.

मेट्रोचा तिकिट दर किमान १० रूपये व कमाल ५० रूपये असेल. प्रवाशांना मेट्रोपर्यंत येणे सुलभ व्हावे यासाठी स्थानकांच्या खालील रिकाम्या जागेत बस बे तसेच रिक्षा थांबे असणार आहेत. स्थानकात जाण्यायेण्यासाठी दोन्ही बाजूस जिने, सरकते जिने व लिफ्ट अशा तीन सुविधा सुरू झाल्या आहेत. पहिल्या मजल्यावर तिकिट घर तसेच स्टॉल्स असतील. दुसर्या मजल्यावर प्लॅटफार्म. त्याची लांबी १४० मीटर, रूंदी २१ मीटर आहे. संपूर्ण स्थानक वातानुकूलीत असेल. सौर ऊर्जेवर त्याचे कामकाज चालेल.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNarendra Modiनरेंद्र मोदी