शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाकडून प्रवाशांना खुशखबर; परवडणाऱ्या दरात घडविणार 'रामोजी फिल्मसिटी'ची सफर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 12:34 IST

हैद्राबाद येथील रामोजी फिल्मसिटीचे पर्यटकांना विशेष आकर्षण

ठळक मुद्देबसचे तिकीट दर, प्रवास मार्ग, तेथील राहण्याची व्यवस्था आदीचे नियोजन

पुणे : रायगड, महाबळेश्वर, लोणावळा दर्शन या विशेष बससेवांपाठोपाठ आता एसटी महामंडळ पुणे विभाग प्रवाशांना रामोजी फिल्मसिटीची सफर घडविणार आहे. त्यासाठी एसटीची लक्झरी बस प्रवाशांचे सेवेत असेल. प्रवाशांना परवडणाऱ्या दरात दोन रात्रीच्या मुक्कामासह फिल्मसिटी पाहता येणार आहे.

एसटी महामंडळाकडून घटलेले उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. दिवाळीच्या कालावधीत जादा बससेवेला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. पण ख्रिसमस व नवीन वर्षाच्या पार्श्वभुमीवर पुणे विभागाने महाबळेश्वर, रायगड, लोणावळा, कोकण, अष्टविनायक, गाणगापुर दर्शन या विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. या गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे एसटीकडून पर्यटन, ऐतिहासिक, धार्मिक ठिकाणांसाठी विशेष सेवा वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.  हैद्राबाद येथील रामोजी फिल्मसिटीचे पर्यटकांना विशेष आकर्षण आहे. पुण्यातून अनेक जण सुट्टयांमध्ये पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी फिल्मसिटीमध्ये जातात. याअनुषंगाने एसटीने पुण्यात रामोजी फिल्मसिटी दर्शन ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

याविषयी माहिती देताना पुणे विभागाचे वाहतुक अधिकारी ज्ञानेश्वर रणवरे म्हणाले, लवकरच रामोजी फिल्मसिटी सेवा सुरू केली जाणार आहे. याबाबत फिल्मसिटीच्या व्यवस्थापनाशी चर्चा सुरू आहे. बसचे तिकीट दर, प्रवास मार्ग, तेथील राहण्याची व्यवस्था आदीचे नियोजन केले जात आहे. प्रवाशांना परवडणाऱ्या दरातच ही सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.-------अकरा मारुती दर्शनअष्टविनायक दर्शन या बससेवेप्रमाणे आता अकरा मारूती दर्शन बससेवाही सुरू होणार आहे. प्रत्येक शनिवारी ही बस धावेल. या सेवेचे तिकीट दर, बसची वेळ, प्रवासाचा मार्ग ही माहिती लवकरच प्रवाशांना दिली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेhyderabad-pcहैदराबादST Strikeएसटी संपpassengerप्रवासीtourismपर्यटन