शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! धरण परिसरात मुसळधार; शहरावरील पाणी कपात टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 19:53 IST

२६ जुलैनंतर पाणीपुरवठा नेहमीप्रमाणे होणार

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण परिसरात झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरणे ६९ टक्क्यांपेक्षा अधिक भरली असल्याने, २६ जुलैनंतरही पाणीपुरवठा नेहमीप्रमाणे होणार आहे. तूर्तात तरी शहरात कोणतीही पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात येणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरूध्द पावसकर यांनी दिली.

दरम्यान भविष्यात होणारा पाऊस व धरणांमधील पाणीसाठा विचारात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामधील पाणी साठा कमी झाल्याने, पुणे महापालिकेने ४ ते ११ जुलै दरम्यान एक दिवसा आड पाणी पुरवठय़ाचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र १० तारखेला असलेल्या आषाढी एकादशी आणि बकरी ईद विचारात घेता दिनांक ८ ते ११ जुलैपर्यंत दररोज पाणी पुरवठा नियमितपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर ११ जुलै रोजी चारही धरणांमधील पाणीपुरवठा लक्षात घेता पुढील पाणीकपातही रद्द करण्यात आली होती व २६ जुलैपर्यंत दररोज पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे जाहिर केले होते.

२६ जुलै रोजी धरणात पाणीसाठा व पाऊस पाहून पाणीकपातीबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल असे महापालिकेने सांगितले होते. मात्र २२ जुलै रोजीच महापालिकेने संभाव्य पाणीकपात होणार नसल्याचे जाहिर केल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

धरणातील पाणी साठा(२२ जुलै रोजी सायंकाळी पाचपर्यंत)-

  • खडकवासला - (१.९४ टीएमसी) टक्केवारी ९८.४०
  •  पानशेत- (७.६० टीएमसी) टक्केवारी ७१.३७
  •  वरसगाव- ( ८.४२ टीएमसी) टक्केवारी ६५.६६
  • टेमघर- ( २.०७ टीएमसी ) टक्केवारी ५५.९७

४ धरणांमधील एकूण साठा :- २०.०३ टीएमसी, टक्केवारी ६८.७३ टक्के.

२२ जुलै रोजी गेल्यावर्षीचा पाणीसाठा :- १४.२३ टीएमसी, टक्केवारी ४८.८४

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका