शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बारामतीकरांसाठी आनंदाची बातमी! ...अखेर शहराचा ‘अनलॉक’च्या दिशेने प्रवास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 13:19 IST

दोन महिन्यानंतर व्यापाऱ्यांना दिलासा, सर्व दुकाने ९ ते १ वाजेपर्यंत खुली राहणार

ठळक मुद्देबारामती शहरात गेल्या तीन महिन्यांपासून असणारा कोरोनाचा आलेख घसरण्यास सुरवात झाली आहे.

बारामती: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेल्या बारामतीचा प्रवास आता ‘अनलॉक’च्या दिशेने सुरु झाला आहे. उद्या (मंगळवार) पासून बारामती शहरातील सर्व दुकाने सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. १५ जुनपर्यंत हि वेळ कायम राहणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. बारामतीत गेल्या २४ तासात केवळ ८ कोरोनाबाधित आढळले आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून असणारा कोरोनाचा आलेख घसरण्यास सुरवात झाली आहे. एप्रिल मध्ये जवळपास दररोज ४०० च्या घरात शहर आणि तालुक्यात कोरोनाबाधित आढळण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे कोरोनाबाधितांची साखळी ‘ब्रेक’ करण्यासाठी प्रशासनाने निर्बंध लादले होते.५ एप्रिलपासून संपूर्ण बारामती बंद आहे. अखेर दोन महिन्यानंतर व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारपासून काही वेळ का होईना दुकाने उघडण्यास परवानगी मिळाल्याचे सुत्रांनी सांगितले.

सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत सर्व दुकाने खुली राहणार आहेत. तर अत्यावश्यक वर्गातील दुकानांची वेळ आता वाढविण्यात आली आहे. किराणा, भाजीपाला, दूध  आदी अत्यावश्यक सेवेअंतर्गत असणारी दुकानांची वेळ यापुर्वी ११ वाजेपर्यंत होती. आता हि वेळ मंगळवारपासून ४ वाजेपर्यंत असणार आहे.

दरम्यान गेल्या दोन महिन्यापासून व्यापार बंद होता. त्यामुळे व्यापाऱ्यांची अडचण वाढली आहे. कामगारांचा पगार, बँकेचे व्याज, सरकारी टॅक्स, वीजबिल,टेलीफोन बिल, जागा भाडे, नगरपरीषद टॅक्स आदी खर्च त्यामुळे व्यापारी हतबल झाला होता. रुग्णसंख्येत घट होताना दिसून येत आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवा सुरु होत्या. मात्र, इतर व्यवसायांना देखील कोविड नियमांच्या आणि वेळेच्या बंधनासह परवानगी देण्याची मागणीने जोर धरला. कोरोना रुग्णांची घट आणि व्यापाऱ्यांची मागणी या पार्श्वभूमीवर परवानगी मिळाली आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र