बारामतीकरांसाठी आनंदाची बातमी: पहिल्या टप्प्यात ३ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणार कोरोनाची लस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 04:50 PM2021-01-12T16:50:04+5:302021-01-12T17:04:11+5:30

शनिवारपासून होणार लसीकरणास सुरूवात

Good news for Baramatikars: 3,500 health workers will get corona vaccine In the first phase | बारामतीकरांसाठी आनंदाची बातमी: पहिल्या टप्प्यात ३ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणार कोरोनाची लस

बारामतीकरांसाठी आनंदाची बातमी: पहिल्या टप्प्यात ३ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणार कोरोनाची लस

Next
ठळक मुद्देलसीकरणानंतर सबंधित आरोग्य कर्मचाऱ्याला सुमारे अर्धातास निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार

बारामती : नव्या वर्षात बारामतीकरांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. शनिवारी (दि. १६) पासून पहिल्या  बारामती शहर व तालुक्यातील खासगी तसेच शासकीय सुमारे ३ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरणास सुरूवात करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. 

आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना रूग्णांशी जवळून संपर्क येत असल्याने राज्य व केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ५ पथके तयार करण्यात आली आहे. यामध्ये १ व्हॅक्सीनेटर (प्रत्यक्ष लस देणारा) सोबत ४ सहकारी असणार आहेत. त्यानुसार २५ आरोग्य कर्मचाऱ्यांना मंगळवारी (दि. १२) पुणे येथे लसीकरणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तालुक्यातील १ हजार २७८ शासकीय आरोग्य कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील २ हजार २०० आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड अ‍ॅपवर लसीकरणासाठी नोंदणी केली होती. या सर्व कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक दिवसाला ३०० ते ४०० जणांना कोरोनाची लस देण्यात येणार असून आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत बारामती मधील कोरोनाचा लसीकरणाचा  पहिला टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे.  

रूई येथील शासकीय महिला रूग्णालय व सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाची तयारी करण्यात आली आहे. यासाठी लसीकरण कक्ष उभा करण्यात आला आहे. यामध्ये प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. लस घेण्यापूर्वी सबंधित आरोग्य कर्मचाऱ्याची संपूर्ण शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पोलीस , होमगार्ड, नगर परिषदेचे सर्व कर्मचारी, शिक्षक,अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांना लस दिली जाणार आहे. तर पुढील तिसऱ्या टप्प्यात साठ वर्षा पुढील व्यक्तींना तसेच मधुमेह व रक्तदाब असणाऱ्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यासाठी योग्य वेळी सूचना देण्यात येतील असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी सांगितले.

लसीकरणानंतर सबंधित आरोग्य कर्मचाऱ्याला सुमारे अर्धातास निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. एखाद्या व्यक्तीस लसीकरण केल्यानंतर त्रास सुरू झाल्यास प्राथमिक उपचारासाठी एएसआय किट याठिकाणी उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. लसीकरण सुरू झाले असले तरी सर्वांपर्यंत लस पोहचण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे मास्क, सॅनिटाईझर व सोशल डिस्टंन्सचे नियम पाळणे गरजचे आहे.- डॉ. मनोज खोमणे,तालुका आरोग्य अधिकारी, बारामती.

Web Title: Good news for Baramatikars: 3,500 health workers will get corona vaccine In the first phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.