कुकडी प्रकल्पात चांगली वाढ
By Admin | Updated: August 4, 2014 04:19 IST2014-08-04T04:19:38+5:302014-08-04T04:19:38+5:30
कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यांतील पाच धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणांच्या उपयुक्त पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे

कुकडी प्रकल्पात चांगली वाढ
नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यांतील पाच धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणांच्या उपयुक्त पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. सर्व धरणांमध्ये सरासरी ५४.८६ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे़ येडगाव धरण ९० टक्के तर वडज धरण ८६.४३ टक्के भरले आहे़ या दोन्ही धरणांमधून अतिरिक्त पावणेदोन टी़ एम़ सी़ पावसाचे पाणी नदी व कालव्याद्वारे सोडण्यात येत आहे़, अशी माहिती नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभाग क्ऱ १ चे कार्यकारी अभियंता शिवाजीराव बोलभट यांनी दिली़
पाच धरणांमध्ये १६७०० द़ ल़ घ़ फूट उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गतवर्षी या
दिवसाअखेर २२२०५ द़ ल.घ़ फूट पाणीसाठा (७२.७१ टक्के) उपलब्ध होता़ १ जूनपासून झालेल्या पावसामुळे पाचही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात १९ टी़ एम़ सी़ पाणी आले़ त्यापैकी अतिरिक्त पावसाचे पावणेदोन टी़ एम़ सी़ पाणी नदी व कालव्यांद्वारे सोडण्यात आले आहे़ वर्षभरात प्रथमच मीना नदीला पाणी सोडण्यात आल्यामुळे या नदीच्या पात्रात असलेले डे्रनेजचे पाणी वाहून गेल्याने मीना नदीतील दुर्गंधी कमी झाली आहे़
वडज धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये १०११ द़ ल.़ घ़ फूट (८६.४३ टक्के) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.़ दिवसभरात ५७ मि़ मी़ पाऊस झाला आहे़ १ जूनपासून आजअखेर ३३७ मि़ मी़ पाऊस या धरणक्षेत्रात झालेला आहे़ (वार्ताहर)