शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

साखर निर्यातीला येणार अच्छे दिन..! जगभरातून मागणी वाढणार

By नितीन चौधरी | Updated: February 21, 2025 18:39 IST

राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचा अंदाज

पुणे : येत्या खरीप हंगामात देशात पावसाचे प्रमाण चांगले राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रासह देशात उसाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. परिणामी साखर उत्पादनात वाढ होणार आहे. दुसरीकडे ब्राझील, थायलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान व इतर देशांमधील ऊस व साखर उत्पादनाची ताजी परिस्थिती लक्षात घेता पुढील दोन वर्षे देशातील साखरेला श्रीलंका, अफगाणिस्तान, पूर्व आशिया, मध्य आखाती देशांमधून चांगली मागणी राहील, असा अंदाज राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने व्यक्त केला आहे.दुबई येथे नुकतीच चार दिवस साखर परिषद झाली. यामध्ये जगभरातील शंभर देशांतून तब्बल ९०० प्रतिनिधी उपस्थित होते. भारतातर्फे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे तसेच इस्मा व खासगी क्षेत्रातील इतर संस्थाचे प्रमुख यात सहभागी झाले हाेते. या परिषदेमध्ये भारतातील यंदा घटणाऱ्या साखर उत्पादनाबाबत सविस्तर चर्चा झाली. मात्र, त्याचवेळी १ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणाऱ्या नव्या गाळप हंगामाची व त्यातून तयार होणाऱ्या अपेक्षित साखर उत्पादनाचा ऊहापोह करण्यात आला.विशेषत: महाराष्ट्रातील प्रमुख जलाशयांत उपलब्ध असणारा पाणीसाठा तसेच भारतीय हवामानशास्त्र विभाग व ऑस्ट्रेलियातील हवामान विभागाने वर्तविलेल्या प्राथमिक अंदाजानुसार यंदा पाऊसमान समाधानकारक राहणार असून त्याचा अनुकूल परिणाम उभ्या उसाच्या वाढीवर तसेच २०२६-२७ मध्ये नव्या ऊस लागणीवर होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला. ही सर्व परिस्थिती तसेच ब्राझील, थायलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान व इतर देशांमधील ऊस व साखर उत्पादनाची ताजी परिस्थिती लक्षात घेता २०२५-२६ व २०२६-२७ या दोन वर्षांत भारतीय साखर उद्योगाचा जागतिक साखर बाजारामध्ये दबदबा निर्माण होण्याची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने पूर्वतयारी म्हणून भारताने नव्या हंगामात मोठ्या प्रमाणावर साखर निर्यातीचे नियोजन करणे महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. 

ऑक्टोबर २०२५ ते जून २०२६ या काळात भारतातील साखरेला श्रीलंका, अफगाणिस्तान, पूर्व आशिया, मध्य आखाती देशांमधून चांगली मागणी राहण्याचे भाकीत आहे. हे लक्षात घेऊन सर्व कारखान्यांनी आतापासूनच येणाऱ्या साखर उत्पादन वर्षाचे योग्य नियोजन करावे. - हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊस