शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सराफ व्यावसायिकांनी मागितली २० लाखांची खंडणी, चार जण जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 17:53 IST

जमीन मालकाला गोळ्या घालण्याची दिली धमकी

ठळक मुद्देछापा टाकून शंभरहून अधिक मूळ खरेदीखत दोन आलिशान गाड्या अणि दोन रिव्हॉल्व्हर जप्त

पुणे: मालकाने जमीन खरेदीखतामधील उर्वरित रक्कम मागितल्याचा राग मनात धरून गोळ्या घालण्याची धमकी देत २० लाख रूपयांची खंडणी मागणाऱ्या  बुधवार पेठेतील बड्या सराफी व्यावसायिकासह चार जणांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. हा प्रकार मे २०६१ ते एप्रिल २०२१ दरम्यान घडला आहे. सराफी व्यावसयिक गौतम जयंतीलाल सोळंकी आणि रणधीर जयंतीलाल सोळंकी यांच्यासह दिलीप साहेबराव यादव, सुमीत प्रकाश साप्ते आणि सागर दत्तात्रय मुजुमले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, रणधीर सोळंकीसह तिघांना अट्क करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भोर तालुक्यातील ससेवाडीचे रहिवाशी आहेत. त्यांनी २०१६ मध्ये वडिलोपार्जित जमीन विक्रीचा व्यवहार आरोपींबरोबर केला होता. त्यांनी आपली जमीन ९३ लाख रूपयांना विकली होती. त्यापैकी ३२ लाख ५० हजार रूपयांची रक्कम आरोपींनी त्यांना दिली होती. उर्वरित ६० लाख २५ हजार रूपयांची रक्कम फिर्यादी सोळंकी यांच्या दुकानात गेले असता त्यांनी चेक देण्यास नकार दिला. त्यानंतर फिर्यादी हे मध्यस्थी असलेल्या दिलीप यादव यांच्या कार्यालयात गेले. मात्र यादव आणि साप्ते यांनी त्यांच्या कमरेला असलेले रिव्हॉल्व्हर त्यांच्या अंगावर रोखले आणि २० लाख रूपये दिल्याशिवाय चेक देणार नाही. काय करायच ते कर. पुन्हा आला तर गोळ्या घालीन आणि पोलिसांमध्ये गेलास तर याद राख अशी धमकी त्यांनी फिर्यादी यांना दिली.

त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. या अर्जाची खातरजमा करून त्यांच्या ऑफिस व घरावर छापा टाकून चार जणांना अटक केली आहे. छापादरम्यान शंभरहून अधिक मूळ खरेदीखत, साठेखत, विसारपावती, संमतीपत्र, करारनामे, एमओयू मिळाले आहेत. यात सही केलेले ब्लँक चेकबुक व चेक, सही केलेले मुद्रांक, दोन आलिशान गाड्या अणि दोन रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास विरोधी पथकाचे खंडणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील करत आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक