शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

हळदीच्या कार्यक्रमातून सोन्याचांदीचे दागिने लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 21:52 IST

नेवसे व वाघ या कुटुंबातील वधुवरांचा विवाह सोहळा सोमवारी होता. साखरपुडा झाल्यानंतर वर पक्षातील सर्व महिला हळद लावण्यासाठी कार्यालयाच्या सभागृहात गेल्या.

ठळक मुद्देपिशवीमध्ये सोनसाखळी, मणि मंगळसूत्र, असा दीड लाखांचा ऐवज

नीरा : विवाह सोहळ्यात हळदीच्या कार्यक्रमादरम्यान नवरदेवाच्या खोलीतून सोन्याचांदीचे दागिने लंपास केले. ही घटना नीरा जवळील पाडेगाव (ता. खंडाळा) येथील जय दुर्गा मंगल कार्यालयात सोमवारी दुपारी घडली. चोरट्यांनी एकूण दीड लाखांचा ऐवज लांबविला आहे. राहुल हणुमंत वाघ (रा.वीर, ता.पुरंदर) यांनी लोणंद पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेवसे व वाघ या कुटुंबातील वधुवरांचा विवाह सोहळा सोमवारी होता. साखरपुडा झाल्यानंतर वर पक्षातील वाघ कुटुंबातील सर्व महिला हळद लावण्यासाठी कार्यालयाच्या सभागृहात गेल्या. त्यांच्यातील एक आजीबाई खोलीतच होत्या. त्यावेळी अज्ञात महिला खोलीत आली. आजींना पाहुणी असल्याचे सांगत शंभर रुपयांचा आहेर दिला. गरोदर असल्याची बतावणी करीत पाय-या चढायला डॉक्टरांनी मनाई केल्याचे सांगत ती खोलीमध्ये बसली. हळद खेळायला पाठविलेल्या आजी परत येईपर्यंत या महिलेने खोलीतील वस्तू अस्ताव्यस्त करून सोने, चांदी व मोत्याचे दागिने असलेली पिशवी घेऊन पोबारा केला. पिशवीमध्ये सोनसाखळी, मणि मंगळसूत्र, कानातले झुबे, चांदीचे पैंजण, मोत्याची नथ असा दीड लाखांचा ऐवज होता. सर्व महिला परत आल्यावर दागिने गायब असल्याचे लक्षात आले. 

टॅग्स :PurandarपुरंदरCrimeगुन्हाGoldसोनंPoliceपोलिस