शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पालखी सोहळ्यात भाविकांचे दागिने चोरणारे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 16:40 IST

पालखी सोहळ्यातील गर्दीचा फायदा घेत भाविकांचे दागिने चोरणा-या दोन तरूणांना गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले.

ठळक मुद्देदोन तरूणांना गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले असून त्यांच्याकडून एक लाखांचे दागिने हस्तगत

लोणी काळभोर : पालखी सोहळ्यातील गर्दीचा फायदा घेत भाविकांचे दागिने चोरणा-या दोन तरूणांना गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले असून त्यांच्याकडून एक लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक मछिंद्र जाधव (वय २३, रा. शास्त्रीनगर, मावंडीनाका, बीड) व विशाल राजू तुपे (वय २२, रा. पानवल, ता. माण, जि. सातारा ) यांना अटक करण्यात आली आहे. श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा मंगळवार (१० जुलै ) रोजी दुपारच्या विसाव्यासाठी ऊरूळी कांचन (ता. हवेली) येथे आला होता. सोहळ्याचे आगमन झाले, त्यावेळी ओंकार बाळासाहेब जगताप (वय २१, रा. आश्रम रोड, लाठी हॉस्पिटल शेजारी, ऊरूळी कांचन) हे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शंभो महादेव डेअरी जवळ वारकरी व भाविकांना पाणी वाटण्याचे काम करत होते. त्यावेळी झालेल्या गर्दीत त्यांना गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावण्यात आल्याचे जाणवले. तेव्हा ते मोठ्याने ओरडले. त्याचवेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश ढवाण, पोलीस हवालदार सागर कडू, अमोल भोसले, समीर चमनशेख यांनी दिपक जाधव याला जागीच पकडले. चोरी केलेली सोनसाखळी त्याने तोंडात लपवली होती. ती पोलिसांनी ताब्यात घेतली.   पालखी सोहळा दुपारच्या विसाव्यानंतर मुक्कामासाठी यवत (ता. दौंड) कडे निघाला. तो पुणे - सोलापूर महामार्गावर दुपारी सव्वातीनच्या सुमारास हॉटेल सोनाई समोर आला. त्यावेळी तेथे निलिमा मनोज कांचन (वय ३२, रा. कृष्णछाया गार्डन सोसायटी, सदनिका क्रमांक १, डी विंग, डाळींब रोड, ऊरूळी कांचन) हे पतीसमवेत पादुकांचे दर्शन घेत असताना त्यांना गळ्यातील ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण हिसका मारून तोडल्याचे जाणवले. ते मागे असलेल्या व्यक्तीच्या हातात दिसल्याने त्यांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून पोलीस हवालदार घारे यांनी विशाल तुपे याला जागीच पकडले. त्यावेळी तुपे याने चोरलेले गंठण रस्त्यावर फेकून दिले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrimeगुन्हाtheftचोरीPoliceपोलिसPandharpur Wariपंढरपूर वारी