पुणो विमानतळावर सोने पकडले
By Admin | Updated: October 26, 2014 01:11 IST2014-10-26T01:11:42+5:302014-10-26T01:11:42+5:30
लोहगाव विमानतळावर तब्बल 2 किलो 111 ग्रॅम सोने विमानतळ प्राधिकरणाच्या एअर इंटेलिजेन्स युनिटने पकडले.

पुणो विमानतळावर सोने पकडले
पुणो : लोहगाव विमानतळावर तब्बल 2 किलो 111 ग्रॅम सोने विमानतळ प्राधिकरणाच्या एअर इंटेलिजेन्स युनिटने पकडले. याप्रकरणी मोहम्मद मोहसीन मोबीन शेख (रा. मुंबई) व प्राधिकरणच्या स्वच्छता विभागाचा सिनीअर अटेंडंट बशीर शेख यांना अटक करण्यात आली आहे.
गुरुवारी एअर इंडीयाचे विमान दुबईहून आले. त्या विमानामधून मोहम्मद हा उतरला. त्याच्याशी बशीर हा बोलत असताना एआययुच्या अधिका:यांना संशय आला. बशीरच्या मागोमाग मोहम्मद विमानतळावरील इमिग्रेशन काऊंटरजवळील वॉशरुममध्ये या दोघांनाही पकडण्यात आले. (प्रतिनिधी)