राजगुरुनगरमध्ये गोकुळ अष्टमी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:12 IST2021-09-03T04:12:26+5:302021-09-03T04:12:26+5:30
यानिमित्त सकाळी अभिषेक व महापूजा यजमान हनुमंत सैद यांचे चिरंजीव श्री व सौ. सागर सैद????? या उभयतांच्या हस्ते करून ...

राजगुरुनगरमध्ये गोकुळ अष्टमी साजरी
यानिमित्त सकाळी अभिषेक व महापूजा यजमान हनुमंत सैद यांचे चिरंजीव श्री व सौ. सागर सैद????? या उभयतांच्या हस्ते करून उत्सवास सुरुवात झाली. दुपारी श्री दत्त विश्वस्त मंडळाचे भजन, जप, ओम नमः शिवाय नामाचा जयघोष व सायंकाळी भक्त मंडळींच्या उपस्थितीमध्ये जन्मोत्सव साजरा करण्यात आला. नंतर हरी जागर, आरती व सुंठवडा प्रसाद वाटप करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी दुपारी श्री दत्त विश्वस्त मंडळाचे भजन होवून श्रींची आरती आणि परंपरेनुसार काळ्या वालाच्या घुग-यांचा प्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता झाली.
उत्सवाच्या कार्यक्रमाचे संयोजन मंडळाचे अध्यक्ष प्रताप आहेर, हनुमंत सैद, प्रकाश तेंडोलकर, प्रभाकर जाधव, पांडुरंग साळुंके, नथुराम तनपुरे, रवींद्र सांडभोर, माणिक तनपुरे, अजित डोळस, नारायण जाधव, अविनाश नाणेकर, समीर आहेर, मधुकर आहेर, बाबा साळुंके, अॅड. गणेश होनराव, मंदार पिसाळ, शरद चोपडे, लक्ष्मण कहाणे, कमल पिसाळ, कुसुम तनपुरे, जनाबाई सैद, जयश्री आमडेकर, सुनंदा दहितुले आदी गुरू बंधू-भगिनींच्या सहकार्याने करण्यात आले होते.