शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
3
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
4
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
5
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
7
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
8
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
9
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
10
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
11
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
12
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
13
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
14
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
15
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
17
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
18
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
19
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
20
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी

गोखले इन्स्टिट्यूटचा परीक्षा पॅटर्न वापरण्यासाठी चाचपणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 12:54 AM

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अभिमत विद्यापीठांना बंधनकारक असले तरी राज्य शासनाच्या आदेशाचेही उल्लंघनही करता येत नाही. पुणे जिल्ह्यात सहा अभिमत विद्यापीठे आहेत.

पुणे : गोखले इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स अभिमत विद्यापीठाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात आॅनलाइन पद्धतीने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या. त्याच पध्दतीने परीक्षा घेण्यासाठी इतर काही अभिमत विद्यापीठांकडून परीक्षांबाबत चाचपणी सुरू आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अभिमत विद्यापीठांना बंधनकारक असले तरी राज्य शासनाच्या आदेशाचेही उल्लंघनही करता येत नाही. पुणे जिल्ह्यात सहा अभिमत विद्यापीठे आहेत. त्यात गोखले इन्स्टिट्यूट, डेक्कन कॉलेज, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ,भारती विद्यापीठ, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ या विद्यापीठांचा समावेश आहे. त्यातील सिंबायोसिस व गोखले इन्स्टिट्यूटने परीक्षा घेतल्या आहेत.परीक्षा कशा घ्याव्यात याबाबतचे सर्वाधिकार विद्यापीठांना आहेत. त्यामुळेच गोखले इन्स्टिट्यूटने १ ते ८ जुलै या कालावधीत आॅनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या असून निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रा. राजस परचुरे यांनी दिली.यूजीसीच्या मार्गदर्शक सूचना व राज्य शासनाच्या आदेशाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय घेतला जाईल. सध्या इतर राज्यात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली जातील, असे डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रसाद जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे