शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

देखावे पाहण्यास जाताय, मोबाइल सांभाळा! दगडूशेठ गणपती परिसरात दररोज ५० ते ६० मोबाइल चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 09:46 IST

आंध्र प्रदेशची महिला टोळी जाळ्यात

पुणे : गौरी विसर्जनानंतर आता गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मध्य वस्तीत गर्दी आणखी वाढत जाणार आहे. त्यामुळे देखावे पाहण्यासाठी जाताना आपला मोबाइल सांभाळा, असे आवाहन करण्याची वेळ आली आहे. कारण दगडूशेठ हलवाई गणपती ते मंडई या परिसरात दररोज ५० ते ६० मोबाइल चोरीला जात आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने आंध्र प्रदेशातील ४ महिलांना मोबाइल चोरताना पकडले आहे.

आगुराम्मा गिड्डीआण्णा गुंजा (वय ३५), आमुल्ला आप्पुतोलाप्रभाकर कंप्परिलाथिप्पा (वय ३७), अनिता पिटला सुधाकर (वय २१), सुशीला इसाम तंपीचेट्टी (वय ३५, सर्व रा. आंध्र प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

खराडी येथे राहणाऱ्या महिला या दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. यावेळी मंडपात मोठी गर्दी झाली होती. चोरट्यांनी फिर्यादी यांच्या पर्सची चेन उघडून त्यातील ४० हजार रुपयांचा मोबाइल चोरून नेला होता. त्याअगोदर काही महिलांचे मोबाइल चोरीला गेले होते. त्यामुळे पोलीस महिलांवर नजर ठेवून हाेते. तसेच सीसीटीव्हीवरून नजर ठेवण्यात येत होती. त्यावेळी या महिला आढळून आल्या.

लालबागला केल्या चोऱ्या

या महिलांकडे चार मोबाइल आढळून आले. त्यातील तीन मोबाइल हे मुंबईतील लालबाग गणपती मंडळाच्या परिसरातून चोरले होते. चौथा त्यांनी नुकताच एका महिलेचा माेबाइल चोरला आणि त्या पोलिसांच्या तावडीत सापडल्या. एका तरुणाच्या पँटच्या खिशातून २ हजार रुपयांची रक्कम चोरत असताना संदीप सुनील बोरसे (वय २७, रा. धुळे) या चोरट्याला पोलिसांनी पकडले आहे.

अशी हाेते चाेरी

- गणेशोत्सवानिमित्त वेगवेगळ्या शहरांतील चोरटे हात साफ करून घेण्यासाठी पुण्यात येत असतात. दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यानंतर बहुतांश भाविक बाबू गेनू व तेथून मंडईच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जातात. तुळशीबागेसमोरील रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी होते. त्याचाच फायदा घेऊन चोरटे लोकांचे मोबाइल, पर्समधील वस्तू चोरून नेत आहेत.- साधारण ५० ते ६० मोबाइल येथून दररोज चोरीला जात असल्याचे समजते. मात्र, पोलीस वेबसाइटवर लॉस्ट ॲन्ड फाउंडवर तक्रार करायला सांगत असल्याने किती जणांचे मोबाइल चोरीला जातात, याचा नेमका आकडा समोर येत नसला तरी किमान ५० मोबाइल चोरीला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. अनेक टोळ्या येथे सक्रिय असल्याचे यावरून दिसून येत आहे.

गुन्हे शाखेची खास पथके

या चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी गुन्हे शाखेची तीन पथके येथे साध्या वेशात तसेच गणवेशात बंदोबस्तावर नेमण्यात आली आहेत. याचबरोबर दगडूशेठ हलवाई मंडळाचे सीसीटीव्ही व या परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण २४ तास तपासले जात आहे. तशी फरासखाना पोलीस ठाण्याच्या इमारतीत व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय स्थानिक पोलीस ठाणे, विशेष शाखेचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Dagdusheth Templeदगडूशेठ मंदिरSocialसामाजिकPoliceपोलिसMobileमोबाइलArrestअटकCrime Newsगुन्हेगारी