शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाविरुद्ध न्यायालयात जाणार : सात्यकी सावरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 18:54 IST

काँग्रेसजनांना बुद्धी यावी

ठळक मुद्देपोवाडे गायनातून मध्य प्रदेश काँग्रेस सेवादलाचा निषेधसावरकरांचे विचार देशभर नव्हे तर, जगभर पोहोचविणे हीच त्यांना खरी आदरांजली

पुणे : ब्रिटिश आणि स्वकियांसोबत एकाच वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लढा दिला आहे. अंदमानमध्ये दोन वेळा काळ्यापाण्याची शिक्षा मिळणार हे समजल्यानंतरदेखील सावरकर डगमगले नाहीत. त्यांनी स्वातंत्र्यासाठी अनेक हालअपेष्टा सहन केल्या. मात्र, त्यांच्याविषयी अवमानकारक व हीन दर्जाचे लेखन केले जात आहे. हे दुर्देवी असून त्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुण्यात सांगितले. मध्य प्रदेश काँग्रेस सेवा दलाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांवर हीन दर्जाचे लेखन केले आहे. याचा निषेध करण्यासाठी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने स्वातंत्र्यशाहीर सावरकर व अन्य शाहिरांच्या पोवाडे गायनातून सारसबाग येथील सावरकरांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रभक्तीचा शाहिरी जागर करण्यात आला. या वेळी स्वा. सावरकरांविषयाचे अभ्यासक अक्षय जोग, प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, शुभांगी आफळे, मोहन शेटे, अरुणकुमार बाभुळगावकर, महादेव जाधव, प्रा. संगीता मावळे आदी उपस्थित होते.सात्यकी सावरकर म्हणाले, भारतातील प्रत्येक क्षेत्रातील नामवंतांनी सावरकरांविषयी गौरवोद्गार काढले आहेत. त्यामुळे सगळ्यांनी या अवमानाचा निषेध करायला हवी. अक्षय जोग म्हणाले, सावरकरांनी समाजप्रबोधनासाठी शाहिरी, काव्य, पोवाडा असे अनेक प्रकार हाताळले. मातृभूमी स्वतंत्र व्हावी, याकरिता शाहिरी काव्यांचे लेखन केले. मात्र, अशा स्वातंत्र्यवीराचा स्वकियांनी अपमान करावा हे दुर्देवी आहे. सावरकरांचे विचार देशभर नव्हे तर, जगभर पोहोचविणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे. हेमंतराजे मावळे म्हणाले, काँग्रेसजनांना बुद्धी यावी, यासाठी हा शाहिरी कार्यक्रम करण्यात आला. सावरकर यांनी लिहिलेले पोवाडे आणि काव्यातून ते आजही आमच्यामध्ये आहेत. प्रत्येकाने सावरकरांच्या अवमानाचा निषेध करायला हवा.

टॅग्स :PuneपुणेVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरcongressकाँग्रेसCourtन्यायालय