शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

रिलायन्स इन्फ्राच्या एमडीची खुर्ची जाणार : न्यायालयाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 18:12 IST

नवी मुंबईतील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेडने शिरुरमधील केंदूर येथे विद्युत लाईन टाकण्याचे काम हाती घेतले होते.

ठळक मुद्देन्यायालयाचा अवमान केल्याने फर्निचर जप्तीची कारवाईन्यायालयाने शेतकऱ्यास व्याजासह नुकसानभराई देण्याचा आदेश दिला डिसेंबर २०१७मध्ये

पुणे : संमतीविना चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्याच्या जमिनीवर विद्युत टॉवर उभारल्या प्रकरणी न्यायालयाने नुकसानभरपाई देण्याचा दिलेल्या आदेश झुगारल्याने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्टर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांची (एमडी) खुर्ची जप्त करण्याचा आदेश पुण्याच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिला आहे.  या प्रकरणी बाळकृष्ण गणपत ताथवडे यांनी याचिका दाखल केली होती. नवी मुंबईतील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेडने शिरुरमधील केंदूर येथे विद्युत लाईन टाकण्याचे काम हाती घेतले होते. शेतकऱ्याला कोणतीही नुकसानभरपाई न देता शेतात उच्चदाब विद्युत वाहिनी उभारण्यात आली होती. ताथवडे यांनी न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर न्यायालयाने शेतकऱ्यास व्याजासह नुकसानभराई देण्याचा आदेश डिसेंबर २०१७मध्ये दिला. नुकसानीची ३ लाख ६ हजार ८५० रुपये रक्कम ६ टक्के व्याज आणि इतर १४ हजार २०२ असा ३ लाख ३९ हजार ४६३ रुपये देण्याच आदेश देण्यात आला होता. मात्र, कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम दिली नाही. त्या विरोधात ताथवडे यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. कंपनीने नुकसानीची रक्कम न दिल्यास रिलायन्स इन्फ्रा स्ट्रक्टर कंपनीच्या व्यवस्थापकी यंसचालकांच्या कार्यालयातील टेबल-खुर्ची, केबिनमधील फर्निचर तसेच कार्यालयातील इतर फर्निचर जप्त करावेत असे आदेश दिले आहे. तसेच न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी कोणत्या प्रकारे व कोणत्या दिनांकास झाली याची माहिती न्यायालयाला ४ जानेवारी २०१९ पुर्वी सादर करावी, असेही आदेशात म्हटले आहे. याबाबत माहिती देताना ताथवडे यांचे वकील अ‍ॅड. दीपक भोपे म्हणाले, विद्युत कायद्याच्या सेक्शन ६५ नुसार शेतकऱ्याला नुकसान भरपाई न देताच विद्युत टॉवर उभारल्या प्रकरणी दावा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने आदेश देऊनही नुकसान भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे पुन्हा न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. न्यायालयाने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, एच ब्लॉक पहिला मजला धिरुभाई अंबानी नॉलेज सिटी येथील कंपनीच्या एमडींच्या कार्यालयातील फर्निचर जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयFarmerशेतकरी