शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तिला सिगारेटचे चटके दिले, शरीरसंबंधासाठी जबरदस्ती केली !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 14:30 IST

हिंजवडी येथे मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली

पुणे/पिंपरी : दोन तरुणांनी एका तरुणीच्या घरात घुसून जाळून टाकण्याची धमकी देत तिला सिगारेटचा चटका देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लोखंडी झारा गरम करून त्याचे चटके देत तरुणीवर शरीरसंबंधासाठी जबरदस्ती केली. हिंजवडी येथे मंगळवारी (दि. ५) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.

हिंजवडीत हा प्रकार घडला असला तरी प्रत्यक्षात या तरुणीने ही घटना आयनॉक्स येथे एका रिक्षामध्ये घडल्याचे सुरुवातीला सांगितले होते. बंडगार्डन पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून त्याची चौकशी केली. त्यात असा कोणताही प्रकार घडल्याचे पुरावे मिळत नव्हते. त्याचवेळी या तरुणीच्या अंगावर भाजल्याचे डाग होते शेवटी महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिला विश्वासात घेतल्यावर तिने खरा प्रकार सांगितले. त्यानंतर हिंजवडी पोलीस ठाण्यात या १८ वर्षाच्या तरुणीची फिर्याद दाखल करून घेण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी मंगळवारी दुपारी घरी असताना दोघेजण तिच्या घरी आले. तुमच्या रूममधून पाण्याचा कॅन घ्यायचा आहे, असे म्हणून एकाने तरुणीच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादी तरुणीसोबत गैरवर्तन केले. त्यामुळे फिर्यादी यांनी स्टीलचा झारा आरोपीला फेकून मारला.

आरोपीने त्याच्या दुसऱ्या साथीदाराला घरात बोलावून घेतले. त्यानंतर तरुणीसोबत शरीरसंबंधासाठी जबरदस्ती केली. जाळून टाकू, अशी धमकीही आरोपींनी दिली. पेटलेल्या सिगारेटने तरुणीला चटका देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने झटका दिल्याने सिगारेट खाली पडली. त्यानंतर आरोपींनी झारा गॅसवर गरम केला आणि त्याने तरुणीच्या हातावर चटका दिला. तरुणीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. दरम्यान, याप्रकरणी संशयितांपैकी एकजण या तरुणीच्या ओळखीचा असल्याचे समजते.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी