शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मापदंडानुसार पाणी देण्याचा ‘अट्टहास’ भोवला..! जलसंपदातील मुख्य अभियंता मुंडे यांची बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 14:57 IST

जलसंपत्ती प्राधिकरणाच्या निर्णयानुसारच शहराला पाणी पुरवठा केला जावा, अशी आग्रही भूमिका मुंडे यांनी घेतली होती.

ठळक मुद्देशहराला पाणी पुरवठा करणारे पंप देखील बंद करण्याची जलसंपदाने केली होती कारवाई

पुणे : जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता टी. एन. मुंडे यांची औरंगाबाद येथील जललेखाच्या मुख्य अभियंतापदी बदली करण्याचा आदेश मंगळवारी राज्य सरकारने दिला. त्यांच्या जागी औरंगाबाद येथील जललेखाचे मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पुणे शहराला वार्षिक ११.५० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी मंजुर केले आहे. म्हणजेच दररोज ८९२ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी शहराला मंजूर आहे. सध्या पुणे शहराचा दररोजचा पाणी वापर १३५० एलएलडी इतका आहे. हा पाणीवापर वार्षिक १७.४० टीएमसी इतका होतो. जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या निर्णयानुसार पाणी दिल्यास शहराच्या दररोजच्या पाणीवापरात सुमारे साडेचारशे एमएलडीची कपात करावी लागणार होती. मात्र, शहराचे पाणी कमी करण्यावरुन महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्याच्या पाणी वाटपाबाबत लक्ष घालावे लागले. त्यांनी देखील पुण्याला साडेतेराशे एमएलडी पाणी मिळेल असे जाहीर आश्वासन दिले.  दरम्यान, जलसंपत्ती प्राधिकरणाच्या निर्णयानुसारच शहराला पाणी पुरवठा केला जावा, अशी आग्रही भूमिका मुंडे यांनी घेतली होती. शहराला पाणी पुरवठा करणारे पंप देखील जलसंपदाने बंद करण्याची कारवाई केली होती. अशी कारवाई एकदा नव्हे तर तीनदा करण्यात आली. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे माजी मंत्री देखील पाणी कपातीवरुन राज्य सरकारला धारेवर धरत होते. जलसंपदा विभागाने पाणी रोखल्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी आंदोलनाचा पवित्राही घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर मुंडे यांची बदली होणार असल्याची चर्चा जलसंपदा आणि महापालिकेच्या वर्तुळात दबक्या आवाजात सुरु होती. मंगळवारी रात्री उशिरा मुंडे यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आला. त्यामुळे पुण्याच्या पाण्यामुळेच मुंडे यांची बदली झाली असल्याचे बोलले जात आहे. -----------------

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMukta Tilakमुक्ता टिळक